सिडको: विशेष प्रतिनिधी
आयटीआय सिग्नल जवळ असलेल्या प्रकाश लोंढे यांच्या धम्मतीर्थ या कार्यालयावर महापालिकेने कारवाईला सुरुवात केली. त्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महापालिकेने जेसीबी सह अन्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. सध्या छतावरील स्ट्रक्चर वेल्डिंगच्या साहाय्याने फलक काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे सातपूर आयटीआय जवळ झालेल्या गोळीबार प्रकरणात प्रकाश लोंढे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर लोंढे यांच्या अडचणीत वाढ झाली. नंदिनी नदीच्या किनारी पूर रेषेत लोंढे यांनी धम्मतीर्थ ऑफिस सुरू केले, तेथेच भुयार सापडले होते. या भुयारात हत्यारे सापडले होते. या धम्मतीर्थ पाडण्याबाबत महापालिकेने नोटीस बजावली होती.त्यासाठी पाच दिवसांची मुदत देण्यात आली होती. या नोटिशीची मुदत काल संपल्यानंतर आज महापालिकेने कारवाईला सुरुवात केली, त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. प्रत्यक्ष पाडकाम अजून सुरू केले नसले तरी इमारती चा पाणीपुरवठा आणि वीज पुरवठा खंडित केल्याचे समजते.