आपण जेव्हा लहान असतो. तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या मनात ही गोष्ट आलेली असते की, आपण मोठे कधी होणार. शाळेत असतो तेव्हा वाटते की आपण कॉलेजला कधी जाणार. परंतु आपले शाळेतले दिवस म्हणजे आपल्या सुखकर आयुष्यातले सुगीचे आनंदाचे खरे दिवस असतात बरं कां. ती शाळेतली धम्माल ती कट्टी-बट्टी वगैरे तसेच कॉलेजमध्ये गेल्यावर अभ्यास करता करता आपण कॉलेजमधले अनेक डे सेलेब्रेट करतो. सारी डे, रोझ डे, चॉकलेट डे यांत एक वेगळीच मजा असते बघा. मित्रांनो, हे शाळा- कॉलेजतले सुगीच्या दिवसांचे हे क्षण एकदा आयुष्यातून निसटले की, परत कधी हे दिवस कधीच आपल्या आयुष्यात येत नाहीत. गेलेला क्षण आणि दिवस हा रोजंच आपल्या आयुष्यातून एक-एक वजा होत जातो. आणि आपण वाढदिवस साजरा करतो. आपण वाढलेल्या वयाचे आणि वजा झालेल्या आयुष्याचे दिवस केक कट करून सेलिब्रेशन करतो.
कॉलेजमधून डिग्री घेतल्यावर आपण नोकरीच्यां शोधात असतो. शिक्षण, नोकरी, लग्न यानंतर आपलं बालपण संपलेलं असतं. आपल्या आयुष्यातलं एक पर्व बालपण संपलेलं असतं. त्या मेंदीच्या पानावरच्या त्या गाण्यासारखं… कपड्यासाठी करीशी नाटक तीन प्रवेशाचे जीवनाचा खरा संघर्ष सुरू होतो. संसाराचा गाडा सुरू होतो. आणि प्रत्येकाच्या मागे पैसे कमवा, आणा आणि द्या ही भूमिका सुरू होते. ह्या आणा आणि पोटासाठीच्या संघर्षात आपण स्वतःला पूर्ण विसरतो. आपल्या कुटुंबासाठी झटत असतो. पण याबरोबर आपण स्वतःची काळजी घेण्यासाठी आणि जगण्यासाठी जर आयुष्याची प्रोव्हिजन केली तर आयुष्य सुखकर होईल.
प्रत्येकाने लग्नानंतर लगेच एक 20 वर्षांची एसआयपी, बचत बँकेत चालू करावी आणि नंतर तिची मुदत संपल्यावर एफडी करावी. प्रत्येक महिन्याला थोडी बचत दीर्घकाळासाठी करावी. म्हणजे 20 वयात चाळिशीसाठी बचत. नंतर साठीचा विचार त्याची एक बचत. नंतर मुलांवर विसंबून न राहता म्हातारपणाची सोय होते बघा. कुटुंबातील प्रमुखाला जबाबदारी पेलावीच लागते. पण ती जबाबदारी पेलताना स्वतःकडेही लक्ष द्या. स्वतःचीही काळजी घ्या. स्वतःवरही प्रेम करा. बचत योजना केल्यामुळे जीवनातील तीन प्रवेशांचे पात्र कसे सुखात आणि आनंदात जगता येईल. आपण लहान असताना आपल्या कुटुंंबप्रमुख घरातील जबाबदारी पेलण्यासाठी जगताना स्वतःकडे दुर्लक्ष करत असते. ती व्यक्ती स्वतःसाठी कधी जगत नाही. सारखे मुलांच्या अपेक्षा जबाबदारी पार पाडत असते. आणि तेव्हा आपल्या बापाच्या जबाबदारीच्या फाटक्या कपड्याकडे आपले लक्षही नसते हो. आणि ज्या मुलांचे त्या बापाकडे लक्ष जाते. तिचं मुले कर्तबगार आणि हुशार सांभाळ करणारी असतात. जी दुर्लक्ष करणारी मुले असतात ती बापाच्या त्यागाच्या बलिदानामुळे अभ्यासात पुढे जाऊन कामानिमित्त बाहेरच्या देशात जातात ती परत भारतात कधी नं येण्यासाठी गेलेली असतात. अशा मुलांमुळे इकडे आई-वडिलांचे काय हाल होतात. याची कल्पनाही त्यांना नसते.आणि नाइलाजास्तव त्यांना आधार आश्रमात जावे लागते. काही मुले बाहेरच्या देशातून आश्रमात पैसे पाठवत असतात. त्यांच्या शेवटचे दर्शन अंत्यविधीलाही यायला त्यांना वेळ नसतो. ही जगातील शोकांतिका आहे.
ज्या आईने शाळेत जाताना रस्ता ओलांडताना मुलाला इजा होऊ नये म्हणून लाडात वाढवलेलं असतं. प्रेमाने जोपासलेलं असतं. ते नातं मुलांच्या लग्नानंतर इतकं कांबिखरलेलं असतं? लेखातून एवढाचं संदेश द्यायचाय की, आपल्या कुणालाही वरती न्यायची सोय नाही. म्हणून जबाबदारी पार पाडताना आई-वडिलांचीही काळजी घ्या. वेळ निघून गेल्यावर फक्त पश्चाताप बाकी काहीच नाही. फक्त पैशासाठी रक्ताची नाती तोडू नका. तर जपा! या लेखाचा कुठल्याही जीवित व्यक्ती अथवा विषयाशी संबंध नाही. आल्यास तो योगायोग समजावा.

happiness

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 days ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 days ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 days ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 days ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 days ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 days ago