गांधीनगर : कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर हार्दिक पटेल पुढील राजकीय भूमिकेविषयी अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यादरम्यान गुजरात कॉंग्रेसचे माजी कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी पुढील पाऊल टाकण्याआधी दखल घेत असलेल्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
गुजरात निवडणूक जवळ असतानाच हार्दिक पटेल यांनी राजीनामा दिला आहे. मुलाखतीत बोलताना हार्दिक पटेल यांनी आपण जेव्हा कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता तेव्हा वडील नेहमी तू चुकीचा पक्ष निवडला आहेस सांगायचे असा खुलासा केला. यावेळी हार्दिक पटेल यांनी कोणत्या पक्षात प्रवेश करणार या प्रश्नावर उत्तर देण्यास नकार दिला.