एक किलो टोमॅटोसाठी मोजावे लागताहेत 80 रुपये

नाशिक : प्रतिनिधी
बाजारात टोमॅटोची आवक कमी झाल्याचा परिणाम भावावर होऊन टोमॅटोच्या दरात मोठी तेजी निर्माण झाली आहे. गेले काही दिवस चाळीस रुपये प्रतिकिलो विकले जाणारे टोमॅटो आता 80 रुपये प्रतिकिलो या दराने विकले जात असल्याने किचनमधून टोमॅटो गायब झाले आहेत.
कोरोनाच्या विळख्यातून सावरणार्‍या नागरिकांना आता वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यापासून महागाई वाढल्याने सर्वसामान्यांचे जगणे कठीण होऊ बसले आहे. त्यात आता इंधनाच्या दरवाढीसोबत जीवनावश्यक साहित्याच्या किंमतीतही वाढ झाली आहे. भाजीपाल्याच्या किंमतीत गगणाला भिडल्या आहेत. भाजीपाल्याच्या वाढलेल्या किंमतीने सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडले आहे. स्वयंपाकात महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या अभावी स्वयंपाक केला जात आहे. टोमॅटोची आवक कमी झाल्याने भाव प्रचंड वाढले आहेत. टोमॅटोचा दर प्रतिकिलो 80 ते 90 रूपयावर गेला आवक अशीच कमी राहिली तर येत्या काही दिवसाच्या टोमॅटोचे दर 100 रू प्रति किलोवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उन्हाळ्यामुळे टोमॅटोच्या लागवडीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे बाजारात टोमॅटोची आवक कमी झाली आहे. सध्या लग्नासराईचा काळ असल्याने टोमॅटोच्या मागणीत वाढ झाली आहे.मध्यंतरी आवक वाढल्याने टोमॅटोला कवडीमोल भाव मिळाले होते. लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले होते. काहीनी शेतात टोमॅटोचे पिक तसेच राहू दिले होते. मात्र असे असले तरी परत टोमॅटोला भाव वाढल्याने किचनमधून टोमॅटो गायब झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *