हौसेला मोल नाही, नवरदेव मिरवणुकीत सबसे कातील… गौतमी पाटील
नाशिक: प्रतिनिधी
हौसेला मोल नसते असे म्हटले जाते,, हौस भागवण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही, पुण्यात बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटील चा कार्यक्रम ठेवल्याची मोठी चर्चा झाली होती, यावरून विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांनी तर गौतमी पाटील कुठेही नाचली तर कुणाचे काय गेले असा डायलॉग मारला होता, आता नाशिक तालुक्यातील कोटमगाव येथील घुगे परिवाराने चक्क नवरदेव मिरवणुकीत गौतमी पाटील ला आमंत्रित केले होते, मात्र कायदा सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि गर्दी वर नियंत्रण करणे अवघड होऊन अनास्था प्रसंग ओढवू शकतो, हे लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे, त्यामुळे गौतमी पाटीलविना आता ही मिरवणूक होणार आहे,
वर मिरवणुकीसाठी कळवण येथील प्रसिद्ध डीजे देखील लावला आहे, त्याच्या पत्रिकाही सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल केल्या आहेत, विशेष म्हणजे जी सुपारी दिली त्याची ऍडव्हान्स दिल्याची पावती देखील पत्रिकेवर छापली आहे,
गौतमी पाटील ची मोठी क्रेझ सद्या दिसून येत आहे, नुकताच नाशिकमध्ये गौतमी पाटील चा कार्यक्रम झाला त्यात मोठा राडा झाला होता, त्यामुळे गौतमीच्या उपस्तिथीत होणारी ही मिरवणूक हटके ठरली असती तथापि, गौतमी चा कार्यक्रम आणि राडा हे समीकरण दृढ झालेलं असल्याने मिरवणूक काढल्यास गर्दीला आवरणे कठिण झाले असते, त्यामुळे परवानगी नाकारल्याने आता गौतमी पाटील येणार नाही, त्यामुळे काहीसा हिरमोड झाला आहे,
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…