नाशिक

अंबड उद्योजकांच्या पाणीबिलात यापुढे फायरसेस नाही

अंबडच्या उद्योजकांना एमआयडीसी चीफ फायर ऑफिसरतर्फे दिलासा

 

नाशिक:प्रतिनिधी

अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या  पाणी देयकात यापुढे फायरसेसची रक्कम समाविष्ट न करण्याचा तसेच फायरसेसह पाठविण्यात आलेली एप्रिल 2023ची बिले मागे घेण्याचा निर्णय निमा व आयमाचे प्रतिनिधी आणि एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आल्याची माहिती निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे व आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी दिली.

   अंबड औद्योगिक वसाहतीमधील दुहेरी फायर सेसबाबत उद्योगमंत्र्यानी स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही या दुहेरी सेस ची टांगती तलवार कायम राहिल्याने त्याबाबत निमा अध्यक्ष धनंजय बेळे व आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी स्थानिक एमआयडीसी कार्यकारी अभियंता यांना आंदोलनाचे निर्देश दिले होते त्या अनुषंगाने एमआयडीसी स्थानिक कार्यालयातर्फे आज चर्चा करण्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुंबई येथील चीफ फायर ऑफिसर श्री वारिक यांच्यासोबत निमा व आयमा च्या प्रमुख अधिकारी एस.एस.वारिक यांच्याबरोबर मंगळवारी महत्वपूर्ण बैठक नाशिक च्या एमआयडीसीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पार पडली.फायरसेस चुकीच्या  पद्धतीने वसूल केला जात आहे.उद्योगमंत्र्यान सोबत झालेल्या बैठकीत हा सेस रद्द करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले होते.त्यानंतरही उद्योजकांकडून ही वसुली सुरु असल्याचे वारिक यांच्या निदर्शनास आणल्यानंतर त्यात वरील  निर्णय तातडीने घेण्यात आले.ज्या उद्योजकांच्या पाणी देयकांत फायर सेसबाबत जास्त पैसे घेण्यात आले त्याचे पुनर्मूल्यांकन करण्यात करण्यात येईल तसेच फायरसेस पूर्वलक्षी प्रभावाने नव्हेतर फायरस्टेशन जेव्हापासून सुरु झाले तेव्हापासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल असे अभिवचन वारीक यांनी यावेळी निमा व आयमाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत अनेक मुद्द्यांवरून उद्योग संघटनाचे पदाधिकारी व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगीही झाली.

      बैठकीस  एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी,कार्यकारी अभियंता जे सी बोरसे, उप अभियंता जे.पी.पवार, फायर ऑफिसर ए सी मांगलकर, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ, निमाचे सरचिटणीस राजेंद्र अहिरे, आयमा चे सरचिटणीस ललित बुब, आयमा उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे,खजिनदार राजेंद्र कोठावदे, मिलिंद राजपूत  आदी उपस्थित होते.

        फायरसेसबाबत एमआयडीसीचे वेगवेगळ्या अधिकारी वेगवेगळ्या पद्धतीने आडमुठेपणाची भूमिका घेत आहे फायरसेस एकाच यंत्रणेने वसूल करावा यासाठी मंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानुसार एमआयडीसीने फायर स्टेशन महापालिकेकडे हसतांतरीत करण्याचे ठरले होते परंतु एमआयडीसीने महापालिकडे कडे कमर्शियल रेटने जो प्रस्ताव पाठविला तो चुकीचा आहे असे निमा व आयमाच्या पदाधिकाऱ्यांनी वारीक यांच्या निदर्शनास आणले.असे असतानाही महानगरपालिकेने मात्र त्याबाबत सामंजस्याची भूमिका घेऊन फायर स्टेशनचा मालकी हक्क एमआयडीसीने त्यांच्याकडेच कायम ठेवावा आम्ही फक्त तो कार्यान्वित करू अशी भूमिका घेतल्याचेही सांगण्यात आले

 असे असूनही काहीतरी वेगवेगळे कारण देऊन एमआयडीसीचे स्थानिक अधिकारी मंत्री महोदय व वरिष्ठांचे निर्देशन पाळता चुकीच्या पद्धतीने नोटींग करत असल्याचे वारंवार निदर्शनास येत असल्याचेही यावेळेस निमा व आयमा पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले,

चर्चे अंती यापुढे फायर सेस पाणी बिलामध्ये लावायचे नाही,असे स्पष्ट निर्देशित वारिक यांनी दिले तसेच हा फायरसेसचा दर कशा पद्धतीने लावला आहे त्याचे स्पष्टीकरण देऊन याची पूर्ण रिविजन करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले आणि जो पूर्वलक्षी प्रभावाने फायरसेस लावलेला आहे त्याबाबतही पूर्ण माहिती घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याचे ठोस आश्वासन दिले.

 

—

 

 

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

1 day ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

2 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

2 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

2 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

2 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

2 days ago