नाशिक

‘भरोसा’ ठेवा, निश्चित तोडगा निघेल!

पाच महिन्यांत 22 महिलांचा संसार फुलला; वादाचे 341 अर्ज प्राप्त

नाशिक शहरातील महिला सुरक्षा शाखेतील भरोसा सेलला जानेवारी ते मेअखेर अशा पाच महिन्यांत एकूण 341 कौटुंबिक वादाचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यात 53 अर्ज वरिष्ठ पातळीवरील, तर 288 अर्ज स्थानिक पातळीवरील आहेत. दोन्ही अर्जांतील 22 महिला नांदण्यास गेल्या असून, त्यांचा संसार फुलला आहे.
जानेवारी ते मे या कालावधीत वरिष्ठ पातळीवरून प्राप्त झालेल्या 53 पैकी 8 अर्जांत महिलांनी नांदण्याचा निर्णय घेतला, सात प्रकरणे न्यायप्रविष्ट झाली. 15 प्रकरणे निकाली काढली. 47 प्रकरणे सध्या प्रलंबित आहेत.
एकही प्रकरण गुन्हा दाखल करण्यापर्यंत गेलेले नाही. स्थानिक पातळीवरील 288 अर्ज दाखल झाले असून, 14 प्रकरणांत महिलांनी पतीकडे परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. 13 प्रकरणांत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. 12 प्रकरणांत गुन्हे दाखल झाले आहेत. 39 प्रकरणांत निर्णय घेऊन निकाली काढण्यात आले आहेत. 249 प्रकरणे सध्या प्रलंबित आहेत. नाशिक शहरातील महिलांच्या कौटुंबिक तक्रारींची संख्या चिंताजनक आहे. मात्र, महिला सुरक्षा शाखेचा भरोसा सेल या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. प्रलंबित प्रकरणांची संख्या मोठी असल्याने अधिक तत्परतेने उपाययोजना करण्याची गरज आहे. पुण्याचे हुंडाबळी प्रकरण राज्यात चर्चेचा विषय ठरले आहे. वैष्णवी हगवणेच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा हुंडाबळी, मानसिक-शारीरिक छळ, संशय, घरगुती हिंसाचार, वादाची प्रकरणे बाहेर येत असल्याचे भरोसा सेलकडील आकडेवारीवरून दिसते.
कौटुंबिक वाद, अत्याचार, मारहाण, संशय आदी कारणांमुळे भरोसा सेलकडे महिलांनी धाव घेतली आहे.
कुटुंबात होणारा त्रास सहन करण्यापलीकडे जात असेल तरी महिला पोलिसांत तक्रार करण्यास धजावत नाहीत. अशावेळी भरोसा सेलची मदत घेऊन त्या संसार सावरू शकतात. त्यामुळे महिलांनी आत्महत्येचा निर्णय घेण्यापूर्वी, कौटुंबिक कारणामुळे आयुष्य संपवण्यापूर्वी एकदा महिला सुरक्षा सेलला भेट द्यावी, असे आवाहन महिला सुरक्षा सेलच्या पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे यांनी केले आहे.

                                                                                                                      नाशिक ः देवयानी सोनार

आकडे बोलतात…
22 : महिला नांदण्यास गेल्या
20 : प्रकरणे न्यायालयात
12 : प्रकरणांत गुन्हे दाखल
54 : प्रकरणे निकालात
296 : प्रकरणे प्रलंबित

 

कौटुंबिक तक्रारींत जीवन संपवण्यापूर्वी

भरोसा सेलला एकदा भेट दिल्यास

नक्कीच चांगला मार्ग निघू शकतो.
                                                – आम्रपाली तायडे,
                                                              पोलिस निरीक्षक,
                                                                    महिला सुरक्षा सेल

                                                                                                                   

Editorial Team

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

17 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

18 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

20 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

21 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

21 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

21 hours ago