कारच्या भीषण अपघातात सहा ठार

एकजण जखमी : चालकाचा ताबा सुटून कार घरावर आदळली

कळवण : प्रतिनिधी
तालुक्यातील मानूर शिवारात कोल्हापूर फाटा येथे मंगळवारी (दि. 4) रात्री सव्वादहाच्या सुमारास कारच्या भीषण अपघातात चालकासह सहा ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला. चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या घरावर आदळली.
नाशिकहून कळवणकडे भरधाव जात असलेल्या हुंदाई आय 10 कारने कोल्हापूर फाट्यावरील विठोबा आहेर यांच्या बंगल्याच्या बीमला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. अपघातात बालकासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत नामपूर (ता. बागलाण) व देवळा येथील रहिवासी आहेत. दोघांना अधिक उपचारासाठी नाशिक येथे नेत असताना उत्कर्ष योगेश मेतकर यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. भालचंद्र मधुकर बधान (वय 65) गंभीर जखमी असून, त्याच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. अपघातावेळी कारचा वेग प्रचंड असल्याने चालकाचा ताबा सुटला. या भीषण अपघातात गाडीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. स्थानिक नागरिकांनी धाव घेत अपघातग्रस्तांना मदतकार्य केले. जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीनंतर चौघांना मृत घोषित केले, तर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नाशिक येथे पाठविले. मात्र, गंभीर दुखापत असल्याने रस्त्यातच एकाच मृत्यू झाला. या हृदय पिळवटून टाकणार्‍या घटनेने नामपूर व देवळा शहरावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी भेट दिली. पोलीस निरीक्षक खगेंद्र टेम्भेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे तपास करीत आहेत.

अपघातातील मृतांची नावे
माधवी योगेश मेतकर (वय 30), त्रिशा योगेश मेतकर (3), उत्कर्ष योगेश मेतकर, शैला वसंत बधान (65), प्रतीक्षा भालचंद्र बधान (50), चालक सगीरखा मेहबूबखा पठाण (वय 67, रा. नामपूर,
ता. बागलाण)

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

16 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

16 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

16 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago