पालखी मार्गावर विशेष आरोग्य सेवेचे नियोजन
नाशिक : प्रतिनिधी
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्यातील वारकर्यांसाठी जिल्हा आरोग्य विभागाने सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली होती.
पालखी मार्गावर आरोग्य उपचार केंद्रे, 108 व 102 रुग्णवाहिका, अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिका, फिरती वैद्यकीय पथके, आरोग्यदूत, शुद्ध पिण्याचे पाणी, रोगप्रतिबंधक उपाययोजना आणि जनजागृती कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, उपसंचालक आरोग्यसेवा डॉ. कपिल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्या नियोजनानुसार ही तयारी करण्यात आली. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहेते आणि सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक लोणे यांनी समन्वयाची जबाबदारी सांभाळली आहे.
पालखी मार्गावरील आरोग्य केंद्रांवर वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, आवश्यक औषधसाठा व ईसीजी तपासणीची सुविधा उपलब्ध आहे. जलस्रोतांचे शुद्धीकरण, पाणी नमुन्यांची तपासणी, धूर व कीटकनाशक फवारणी आणि स्वच्छता मोहीमही राबविण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये जीवनरक्षक औषधांसह आवश्यक वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. संपर्क क्रमांकाचे माहिती फलकही लावले आहेत.
पंढरपूरकडे जाणार्या दिंडींसाठी वीस जणांचे विशेष फिरते आरोग्यपथक नियुक्त करण्यात आले आहे. त्यात दोन वैद्यकीय अधिकारी, दोन समुदाय आरोग्य अधिकारी, 12 आरोग्य कर्मचारी, दोन वाहनचालक आणि दोन रुग्णवाहिका. त्यांपैकी एक जिल्हा परिषद सेस निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेली कार्डियाक रुग्णवाहिका आहे. मुक्कामस्थळी आरोग्यसेवा कक्ष, महिलांसाठी हिरकणी कक्ष, प्राथमिक उपचार व आरोग्य सल्ला उपलब्ध राहील.सुरक्षित पाणी, वैयक्तिक स्वच्छता, संसर्गजन्य रोग, सर्पदंश व प्रथमोपचाराबाबत जनजागृती केली जाणार आहे.
Health Department geared up for Ashadhi Wari.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…