आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार

जालना : काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार | झाल्याने परीक्षा रद्द करण्यात आली होती . ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात यावी अशी आगणी विद्यार्थ्यांनी केली होती.यावर
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली . लवकरच ही भरतीप्रक्रिया सुरू होणार आहे . या परीक्षासंबंधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे , लवकरच या परीक्षा होणार असल्याचे टोपे यांनी सांगितले .
जालना येथे बोलताना राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाची परीक्षा लवकरच होतील , असे स्पष्ट केले . आरोग्य विभागाच्या गट क व गट ड
रिक्त पदांसाठी आरोग्य विभागाचे अधिकारी आणि मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती टोपे यांनी दिली . या रिक्त पदांसाठी त्वरित भरती प्रक्रियेसाठी आरोग्य विभागाच्या रामास्वामी यांच्याशी चर्चा झाली आहे . राज्यात पुन्हा आरोग्य विभागाच्या ‘ क ‘ आणि ‘ ड ‘ च्या परीक्षा लवकरच घेतल्या जातील असंही टोपे म्हणाले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *