नाशिक

डॉक्टरांमुळे आरोग्य तर पत्रकारामुळे समाज सुदृढ

 

 

डॉ. राजेंद्र कुटे ;  गांवकरीच्या देवयानी सोनार यांच्यासह पत्रकारांचा सन्मान

 

 

नाशिकः

कोरोना काळात सर्वच मंदिरे बंद होतो, केवळ आरोग्य मंदिरे अखंडित पणे सुरू होती. अपुर्‍या सोयीसुविधा मध्ये देखील डॉक्टर उत्कृष्ट आरोग्य सेवा देत आहेत.  डॉक्टर हे मध्यम असून त्यांच्यावर होणारे हल्ले दुर्दैवी आहे.  हल्ले रोखण्यासाठी शासनाबरोबरच पत्रकरितेची मोठी मदत होत आहे. डॉक्टरांमुळे आरोग्य तर पत्रकारामुळे समाज होतो सुदृढ होत असल्याची भावना महाराष्ट्र आयएमएचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र कुटे यांनी व्यक्त केली.

 

इंडियन मेडीकल असोसिएशन नाशिकच्या वतीने  पत्रकार दिनानिमित्त सोमवारी (दि. 9) रोजी  इंडियन मेडीकल असोसिएशनच्या (आयएमएम) शालिमार, नाशिक येथील सभागृहात शहरातील पत्रकारांचा गौरव करण्यात आला. त्यात गांवकरी च्या देवयानी सोनार यांच्यासह शहरातील पत्रकारांचा समावेश होता. व्यासपीठावर महाराष्ट्र आय एम ए चे उपाध्यक्ष डॉ अनिरुद्ध भांडारकर,नाशिक आयएमए च्या अध्यक्ष डॉ राजश्री पाटील, सचिव डॉ.विशाल पवार उपस्थित होते.

डॉ कुटे म्हणाले की, पत्रकारांचा गौरव करणारी नाशिकः आय एम ए  एकमेव संस्था आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी समाज चळवळ पत्रकारितेच्या मध्मातून केली. अनेक अनिस्ट प्रथा बंद करण्यामध्ये देखील जांभेकर यांची पत्रकारिता आजही सर्वच्या स्मरणात आहे.   प्रास्ताविकात अध्यक्षा डॉ राजश्री पाटील यांनी वर्षभर केलेल्या सहकार्याबद्दल पत्रकारांचे आभार मानले. पत्रकारांच्या वतीने प्रविण बिडवे आणि धनंजय रीसोडकर यांनी मनोगत व्यक्त केले.  तर सूत्रसंचलन डॉ पल्लवी महाजन यांनी केले.आभार डॉ विशाल पवार यांनी मानले.

कार्यक्रमास  इंडियन मेडीकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. किरण शिंदे, डॉ. गीतांजली गोंदकर, डॉ.शलाका बागुल, डॉ.मनीषा जगताप, डॉ.सागर भालेराव, डॉ.प्रेरणा शिंदे,डॉ माधवी मुठाल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

चौकट

यांचा झाला सत्कार….

यावेळी धनंजय बोडके ( लोकनामा) धनंजय रिसोडकर .(लोकमत )  सचिन जैन (दिव्यमराठी), जहीर शेख (दिव्यमराठी) , अरूण मलाणी (सकाळ), नितीन रणशूर,( पुढारी), प्रविण बिडवे (महाराष्ट्र टाईम्स) , गायत्री जेऊघाले  ( महाराष्ट्र टाईम्स), अनिकेत साठे( लोकसत्ता),  रविंद्र केडीया (देशदूत),अतुल भांबेरे (पुण्यनगरी) , आसिफ सैय्यद (पुण्यनगरी), ,  जितेंद्र येवले (लोकज्योती),  रामदास नागवंशी( भ्रमर) , चंद्रशेखर गोसावी, ( प्रहार ), आहुजा भारती (लोकमत टाईम्स),   अजय भोसले, (लक्ष महाराष्ट्र ),  संतोष सोनवणे (टाईम्स ऑफ इंडिया),  प्रशांत सुर्यवंशी (आपले महानगर) आदींचा गौरव करण्यात आला.

 

 

 

Ashvini Pande

Recent Posts

मनमाडला बंदी असलेल्या नायलॉन मांजाने सिलेंडर वाटप करणारा तरुण जखमी

मनमाडला बंदी असलेल्या नायलॉन मांजाने सिलेंडर वाटप करणारा तरुण जखमी मनमाड : प्रतिनिधी संपूर्ण राज्यात…

20 hours ago

नायलॉन मांजाने घेतला युवकाचा बळी

इंदिरानगर :  वार्ताहर पाथर्डीफाटा येथील चौफुली नजीक दुचाकीहून जाणाऱ्या बावीस वर्षीय युवकाचा गाळ्यात मांजा अडकून…

23 hours ago

सिडकोत नायलॉन मांजा ने घेतला युवकाचा बळी

सिडकोत नायलॉन मांजा ने घेतला युवकाचा बळी नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात नायलॉन…

23 hours ago

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने…

2 days ago

नाशिक मविप्र मॅरेथॉन-२०२५’चा विजेता ठरला मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा

नाशिक मविप्र मॅरेथॉन-२०२५'चा विजेता ठरला मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा मागीलवर्षीच्या स्पर्धेतील विक्रम मोडीत, फूल मॅरेथॉनचे…

3 days ago

ऐकावे ते नवलच! 36 वर्षाच्या विवाहितेचा पंधरा वर्षाच्या मुलाला घेऊन पोबारा

ऐकावे ते नवलच! 36 वर्षाच्या विवाहितेचा पंधरा वर्षाच्या मुलाला घेऊन पोबारा सिडको :  विशेष प्रतिनिधी असे…

6 days ago