जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्य तपासणीसह समुपदेशन
नाशिक : प्रतिनिधी
महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि त्यांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन स्वस्थ नारी, निरोगी परिवार हे विशेष अभियान राबवत आहे. हे अभियान दि. 17 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण राज्यात आयोजित करण्यात आले आहे. विशेषतः पन्नास वर्षांवरील महिलांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी केले आहे.
या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी शिक्षित करणे आणि त्यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करणे आहे. या शिबिरांमध्ये महिलांच्या स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाची प्राथमिक तपासणी, रक्तदाब आणि मधुमेहाची तपासणी, रक्ताची हिमोग्लोबिन तपासणी इतर सामान्य आरोग्य समस्यांसाठी समुपदेशन करण्यात येणार आहे.
या अभियानात राज्यातील सर्व सरकारी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आरोग्य उपकेंद्रे सहभागी होणार आहेत. या अभियानामुळे महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याविषयी प्रोत्साहन मिळेल आणि गंभीर आजारांचे लवकर निदान होऊन योग्यवेळी उपचार सुरू करण्यास मदत होईल.
यामुळे स्वस्थ नारी, निरोगी परिवार हे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल. त्यामुळे या अभियानात सक्रियपणे सहभागी होऊन आपल्या आपल्या कुटुंबातील महिलांना आरोग्य तपासणीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी केले आहे.
या आरोग्य तपासण्या होणार
1. एनसीडी, असुरक्षित महिलांसाठी क्षयरोग तपासणी.
2. किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी अशक्तपणा तपासणी आणि समुपदेशन सेवा. 3. आदिवासी भागातील महिलांसाठी सिकलसेल स्क्रीनिंग, कार्ड वितरण आणि समुपदेशन सेवा. 4. गर्भवती महिलांसाठी प्रसूतीपूर्व काळजी तपासणी, ज्यात हिमोग्लोबिन पडताळणी चाचणी, गर्भधारणेदरम्यान पोषण आणि काळजी याबद्दल समुपदेशन आणि माता व बालसंरक्षण कार्डचे वितरण. 5. बालकांना लसीकरण सेवा प्रदान.
6. किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीतील स्वच्छता आणि पोषण याविषयी जनजागृती. 7. महिला बचतगट आणि पंचायती राज संस्थांच्या महिला प्रतिनिधीद्वारे तेल आणि साखरेचा वापर कमी करण्याबाबत मोहीम. 8.पोषण समुपदेशन आणि निरोगीपणाबाबत सत्र. 9. रक्तदान मोहीम. 10. पीएमजेएवायअंतर्गत नोंदणी. 11. आयुष्मान वयवंदना कार्डचे वितरण. 12. निश्चय मित्र स्वयंसेविकांची नोंदणी.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…