गुन्हे शाखा युनिट-2 ची यशस्वी कारवाई
सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक शहरातील घरफोडी, चोरी, तसेच अवैध शस्त्र बाळगणार्या गुन्हेगारांविरोधात कारवाई करत गुन्हे शाखा युनिट- 2 ने तीन वेगवेगळ्या प्रकरणांत एकूण पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन धारदार तलवारींसह मुद्देमाल जप्त करण्यात आल्या आहेत.
अंबड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी अमोल गायकवाड व स्वप्नील जाधव हे पाथर्डीगाव परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरून गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली. चौकशीअंती त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना अंबड पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी हजर करण्यात आले. पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास करताना चोरी गेलेला मोबाइल गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने तातडीने मालेगाव येथे जाऊन आरोपी सुफीयान रौफ शहा, सगीर अन्सारी व मोहम्मद अमीन अब्दुल रहीम यांना अटक केली. त्यांच्याकडून दहा हजार रुपयांचा मोबाइल हस्तगत करण्यात आला. आरोपींना पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गुन्हे शाखा युनिट-2 च्या अधिकार्यांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश नवाळे चिंचोली फाटा परिसरात हातात धारदार तलवार घेऊन फिरत होता. त्यास तत्काळ अटक करून त्याच्या ताब्यातून दोन धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, प्रेमचंद गांगुर्डे, बाळू शेळके, विलास गांगुर्डे, पोलीस हवालदार संजय सानप, नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, वाल्मीक चव्हाण, महेश खांडबहाले, संजय पोटिंदे यांचा सक्रिय सहभाग होता.
‘जन्म-मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक’ चर्चेविना मंजूर नवी दिल्ली : प्रतिनिधी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या 10 व्या…
भिवंडी/शहापूर : प्रतिनिधी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे बालाजीनगर भागातील कोहिनूर ही चार मजली इमारत कोसळल्याची…
- अॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…
- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…
- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…
आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…