नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिका व राज्य शासन न्यायालयात आज, बुधवारी (दि.4) तपोवन वृक्षतोडप्रकरणी अंतरिम अर्जावर प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. दरम्यान, महापालिकेने बुधवारी प्रतिज्ञापत्र सादर न केल्यास एकतर्फी सुनावणीची मागणी याचिकाकर्ते अॅड. नितीन पंडित करणार आहेत.
शहरात 31 ऑक्टोबर रोजी सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त ध्वजारोहण सोहळा होणार आहे. त्यापूर्वी नाशिक महापालिकेला साधुग्राममधील झाडे तोडायची आहेत. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय त्याआधी लागू नये, असा प्रयत्न नाशिक महापालिका व राज्य शासन यांचा आहे. मात्र, हा प्रयत्न हाणून पाडू, असे याचिकाकर्ते अॅड. पंडित यांनी म्हटले आहे.
यावेळी याचिकाकर्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार आहेत की, कुसुमाग्रज उद्यानातील झाडे शासनाचे नियम पायदळी तुडवून तोडली. अशाच पद्धतीने नाशिक शहरातील अनेक ठिकाणी बेकायदेशीर वृक्षतोड केली जात आहे. यापुढे तपोवनसह शहरात कुठेही झाडे तोडण्यावर स्थगिती देण्याची मागणी केली जाईल, असे अॅड. पंडित यांनी म्हटले आहे.
याचिकेतून केलेल्या मागण्या
नाशिक महापालिकेला निर्देश करावा की, तपोवनातील झाडे तोडू नयेत. साधुग्राममध्ये भारत मंडपमच्या होणार्या प्रकल्पाला स्थगिती द्यावी किंवा रद्द करावा. जर भारत मंडपमचा साधुग्राममधील प्रकल्प नाशिक महापालिका रद्द केल्याचा दावा करत असेल, तर महापालिकेने न्यायालयात प्रकल्प रद्द केल्याबद्दलची माहिती अंतरिम अजार्र्वरच्या प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावी, अशी मागणी अॅड. पंडित यांनी केली आहे.
Hearing on Tapovan tree felling today
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…