जिल्ह्यातील चारशे उद्योगांना फटका बसण्याची शक्यता
नाशिक : प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम देशातील औद्योगिक क्षेत्रावर दिसू लागला आहे. एलपीजी गॅसच्या टंचाईमुळे नाशिकमधील लघू व मध्यम उद्योग अडचणीत आले आहेत. विशेषतः हीट ट्रीटमेंट आणि पावडर कोटिंग करणारे उद्योग गॅसअभावी बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.
या उद्योगांमध्ये उत्पादन प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर गॅसचा वापर केला जातो. मात्र, सध्या गॅसचा पुरवठा नियमितपणे होत नसल्याने अनेक उद्योगांना उत्पादन कमी करावे लागत आहे. पुढील एक-दोन दिवसांत गॅस उपलब्ध झाला नाही तर अनेक उद्योगांना कामकाज थांबवावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
या उद्योगांवर आधारित मोठ्या औद्योगिक कंपन्यांना आवश्यक असलेल्या पार्टसचा पुरवठादेखील यामुळे ठप्प होण्याची शक्यता आहे. परिणामी मोठ्या उद्योगांच्या उत्पादन प्रक्रियेवरही परिणाम होऊ शकतो. याचा थेट आर्थिक फटका उद्योजकांना बसण्याची शक्यता असून, उद्योगक्षेत्रात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उद्योगांत मोठ्या प्रमाणावर कामगार कार्यरत आहेत. उद्योग बंद पडल्यास कामगारांवर विपरीत परिणाम होऊन अनेक कामगारांना स्थलांतर करावे लागू शकते. भविष्यात उद्योग पुन्हा सुरू झाल्यानंतर कुशल कामगार मिळविणे कठीण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
गॅसअभावी उद्योगांत गंभीर स्थिती
हीट ट्रीटमेंट आणि पावडर कोटिंग करणारे उद्योग गॅसअभावी बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या उद्योगांमध्ये उत्पादन प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर एलपीजीचा वापर केला जातो. नाशिक जिल्ह्यातील चारशे उद्योगांत गॅसचा वापर होतो. परिणामी गॅसच्या तुटवड्यामुळे फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एलपीजीचा पुरवठा तातडीने सुरळीत करण्यासाठी शासनाने व संबंधित विभागांनी त्वरित उपाययोजना कराव्यात. उद्योगांचे उत्पादन थांबणे म्हणजे संपूर्ण औद्योगिक साखळीवर परिणाम होणे होय. त्यामुळे प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन उद्योगांना गॅसपुरवठा प्राधान्याने उपलब्ध करून द्यावा.
– राजेंद्र पानसरे,
अध्यक्ष, आयमा
Heat treatment, powder coating industry in crisis due to gas shortage
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…