नाशिक

गॅसटंचाई : नाशकात भरारी पथके; गॅस एजन्सींची होणार तपासणी

नाशिक : प्रतिनिधी
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्र सरकारच्या आदेशानंतर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या विक्रीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात घरगुती गॅसचा काळाबाजार किंवा व्यावसायिक वापर होऊ नये, यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने 17 भरारी पथकांची नियुक्ती केली आहे.
या पथकांपैकी दोन पथके जिल्हास्तरावर, तर 15 पथके तालुकास्तरावर कार्यरत असणार आहेत. ही पथके गॅस एजन्सींची अचानक तपासणी करून व्यावसायिकांना सिलिंडरचा पुरवठा होत नाही ना, तसेच घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत नाही ना, याची खात्री करणार आहेत.
केंद्र सरकारने व्यावसायिक गॅसच्या वापरावर निर्बंध आणल्यानंतर शहरातील गॅस वितरकांना कंपन्यांकडून व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा थांबविण्यात आला आहे. त्यामुळे वितरकांनीही हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट, मेस तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सिलिंडर देण्याबाबत असमर्थता दर्शवली आहे. परिणामी या व्यवसायांवर मोठा परिणाम झाला असून अनेकांचे कामकाज अडचणीत आले आहे. दरम्यान, व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध नसल्याने काही व्यावसायिक घरगुती गॅस सिलिंडर दुप्पट दराने खरेदी करण्यास तयार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे घरगुती गॅसचा काळाबाजार सुरू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी घरगुती सिलिंडर दोन ते अडीच हजार रुपयांना विक्री होत असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसचे वितरण सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव अशोक आत्राम यांनी राज्यातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना दिले आहेत.
जिल्हास्तरावरील पथकांमध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार, पुरवठा निरीक्षक, पोलीस अधिकारी, वजन व मापे विभागाचे प्रतिनिधी तसेच इंधन कंपनीचे विक्री अधिकारी यांचा समावेश असणार आहे. ही पथके जिल्हाभरात कुठेही अचानक तपासणी करतील.
प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र अशी 15 पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांचे अध्यक्ष तहसीलदार असणार असून त्यामध्ये पोलीस अधिकारी, पुरवठा निरीक्षक, वजन व मापे विभागाचे अधिकारी आणि इंधन कंपनीचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. ही पथके संबंधित तालुक्यांमध्ये गॅस एजन्सी व वितरण व्यवस्थेची तपासणी करून नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवणार आहेत.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर बंदी आणल्याने आता गॅस एजन्सींची नियमित तपासणी अत्यावश्यक आहे. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने जिल्हा स्तरावर दोन आणि तालुका स्तरावर प्रत्येकी एक अशी 15 पथके स्थापन केली आहेत. ही पथके नियमितपणे गॅस एजन्सींची तपासणी करतील.
– सीमा आहिरे, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी

Gas shortage: Flying squads in Nashik; Gas agencies to be inspected

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

11 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

11 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

11 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

11 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

12 hours ago