राज्यात पुढील चार दिवस उष्णतेची लाट; मुसळधार पाऊस, गारपिटीचा इशारा

नांदेडमध्ये 47, तर अकोल्यात तापमानाचा पारा 44 अंशांवर

नवी दिल्ली/पुणे : प्रतिनिधी
देशातील हवामानात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. एका बाजूला चक्रीय चक्रवातामुळे देशातील काही राज्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रात ’अँटी-सायक्लोनिक’ स्थितीमुळे तापमानाचा पारा वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पुढील चार दिवसांत हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांत तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, बुधवारी (दि. 15) अकोल्यात मोसमातील सर्वांत जास्त तापमानाची नोंद झाली आहे. अकोल्यात 44.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील सुंदगी या गावात 47 अंश तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे सुंदगी हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे.
अकोल्यात या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. अकोल्याचा बुधवारचा पारा 44. 2 अंशांवर पोहोचला. अकोल्यात तापमानाचे दररोज नवनवे उच्चांक पाहायला मिळत आहेत. परवा 43.8, काल 44 आणि बुधवारी (दि. 15) तापमानाने 44.2 चा टप्पा गाठला. दुपारच्या वेळी अकोल्याच्या रस्त्यांवर उन्हामुळे संचारबंदीसदृश परिस्थिती पाहायला मिळत आहे. पुढचे काही दिवस अकोल्यात तापमानाचे अनेक नवे उच्चांक होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे. सात दिवसांत अकोल्याच्या तापमानात 5.5 अंशांची वाढ झाली आहे.

18,19 ला पावसाची शक्यता

राज्यात तापमानाचा पारा वाढला आहे. मात्र, 18 व 19 एप्रिलला या उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. काही ठिकाणी पावसाचा इशारादेखील देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस प्रत्येक शहरात एक ते दोन अंशाने तापमान वाढणार आहे, अशी हवामान खात्याची माहिती आहे.

राज्यात तापमानाचा पारा वाढला आहे. मात्र, 18 व 19 एप्रिलला या उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. काही ठिकाणी पावसाचा इशारादेखील देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस प्रत्येक शहरात एक ते दोन अंशाने तापमान वाढणार आहे, अशी हवामान खात्याची माहिती आहे.

अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी?

अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका मालवाहू ऑटोमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाच्या अंगावर कुठल्याही मारहाणीच्या जखमा नाहीत. कदाचित या व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी याठिकाणी व्यक्त केला. मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. वैद्यकीय अहवालानंतरच संबंधिताच्या मृत्यूचे मूळ कारण स्पष्ट होईल.

Heat wave in the state for the next four days; Heavy rain, hailstorm warning

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *