नाशिक

सलग दुसर्‍या दिवशीही मुसळधार

तासाभरात 17 मिलिमीटर पावसाची नोंद

नाशिक ः प्रतिनिधी
आठवडाभर पावसाने उसंत घेतल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा अवकाळी पाऊस बरसण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारपाठोपाठ शुक्रवारीही (दि. 6) सायंकाळी पाचच्या सुमारास वातावरणात बदल होऊन पावसाला सुरुवात झाली.
साधारणतः तासभर झालेल्या मुसळधारेमुळे नाशिककरांची चांगलीच तारांबळ उडाली. सकाळपासून आकाश निरभ्र होते. दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत होता. वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत असल्याने नाशिककर हैराण झाले होते. दरम्यान, शुक्रवारी (दि. 6) सायंकाळी पाचनंतर अचानक वातावरणात बदल होऊन मुसळधारेला सुरुवात झाली. तासभर झालेल्या पावसात 17 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हवामान विभागाकडून दोन दिवसांचा यलो अलर्ट नाशिक जिल्ह्याला दिला होता. त्यानुसार सलग दोन दिवस शहरात अवकाळीच्या सरी कोसळल्या. मे महिन्यात जिल्ह्यासह शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील सहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते.

सखल भागात पाणी

शहरात तासभर झालेल्या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. अवकाळीने जर शहरात ठिकठिकाणी पाणी साचत असेल तर ऐन पावसाळ्याच्या दिवसांत काय स्थिती होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आरोग्यावर परिणाम

वातावरणात सतत बदल जाणवत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. सकाळी ऊन, तर सायंकाळी पाऊस होत असल्याने रात्री वातावरणात गारवा निर्माण होत आहे. सततच्या वातावरणातील बदलामुळे नागरिकांना ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी यांसारख्या आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत.

Gavkari Admin

Recent Posts

त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रा. प.कडून 33 जादा बसेसची सोय

नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…

2 hours ago

शहरात दिवसभरात 14.2 मिमी पावसाची नोंद

जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…

3 hours ago

फायदेशीर करार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…

3 hours ago

सणांचा, व्रतवैकल्यांचा महिना श्रावण

श्रावण महिना शुक्रवारपासून (दि. 25) सुरू झाला. हिंदू धर्मात श्रावणाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. श्रावणातील…

3 hours ago

शाही थाटात चमका- लेहंग्यांचे ग्लॅमरस अवतार

लग्नसराई म्हटलं की, डोळ्यासमोर येते ती गाणी, डान्स, डेकोरेशन आणि अगदी हो! तुमचा लूक! त्या…

3 hours ago

फाउंडेशन आधी की कन्सीलर?

परफेक्ट मेकअप करण्यासाठी आधी फाउंडेशन लावावं की कन्सीलर? हा प्रश्न अनेक महिलांना सतावतो. चेहरा नितळ,…

4 hours ago