चांदवड : वार्ताहर
चांदवड शहर परिसरात पावसाचा हाहाकार झाला. गुरुवारी (दि. 9) वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले. सोसाट्याच्या वार्यासह पावसाने मारलेल्या धडकेने जनजीवन विस्कळीत झालेच; शिवाय कांदा व्यापार्यांचे शेड, झाडे, विद्युत खांब कोसळल्याने अनेक वाहनांसह विविध वास्तू-वस्तूंचे नुकसान झाले. दरम्यान, कुठे झाड कोसळून तर कुठे पत्रा लागून अनेक जण गंभीर तर काही जणांना किरकोळ दुखापत झाली.
दोन ते तीन तासांपासून पाऊस, वादळी वारा अन् विजांचा कडकडाट तर काही ठिकाणी गारांचा मारा सुरूच असून, नुकसानीची ठोस माहिती समोर येण्यास आणखी काही वेळ लागणार आहे. यानंतर समोर आलेल्या नुकसानीचा आकडा प्रचंड मोठा येण्याची शक्यता आहे. शहर परिसरात सध्या वीजपुरवठा खंडित असून, पडलेल्या विद्युत खांबांची संख्या जास्त असल्याने वीजपुरवठा सुरळीत होण्यास देखील मोठा विलंब होणार आहे.
दरम्यान, चांदवडचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल हे देखील एका दुर्घटनेत जखमी झाले असून, त्यांच्यावर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात डॉ. हेमराज दळवी यांनी प्राथमिक उपचार करत पुढील उपचारासाठी नाशिक येथे संदर्भित केले आहे. सायंकाळी साडेचार- पाचच्या दरम्यान सुरू झालेला पावसाचा हाहाकार अंधार पडल्यावरही सुरूच असल्याने नुकसानीची ठोस माहिती समोर यायला उशीर होणार आहे.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…