अहो गुरुजी तुम्हीसुध्दा…? शिक्षक आमदार निवडणुकीत दारू आणि मटणाचा महापूर…!
मनमाड : प्रतिनिधी
येत्या २६ जुन रोजी शिक्षक आमदारांची निवडणूक होत आहे या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे संदीप गुळवे महायुतीच्या वतीने पुन्हा एकदा किशोर दराडे तर बंडखोरी करत भाजपचे विवेक कोल्हे हे निवडणूक रिंगणात उतरले आहे अटीतटीच्या या लढाईत कोण बाजी मारेल हे तर निकालानंतर स्पष्ट होईल मात्र ज्या शिक्षकांची ही निवडणूक आहे त्या शिक्षकांसाठी शनिवारी आणि रविवारी महाविकास आघाडी व महायुतीच्या वतीने ओली पार्टी आयोजित करण्यात आली होती या पार्टीत शिक्षकांचे खरे रूप बघायला मिळाले शनिवार असतांना देखील अनेकांनी दारू आणि मटनावर यथेच्छ ताव मारला व काहींनी तर घरी पार्सल सुद्धा नेले यामुळे आयोजकांवर अहो गुरुजी तुम्हीसुद्धा असे म्हणण्याची वेळ आली.
शिक्षक आमदार म्हणून एक प्रतिनिधी देण्यासाठी सध्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे येत्या २६ जुन रोजी यासाठी मतदान होणार आहे या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीतर्फे उमेदवार देण्यात आले आहे यात बंडखोरी करत विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे ही निवडणूक आता चांगलीच रंगात अली असुन या निवडणुकीत शिक्षकांना ओली पार्टी देण्यात आली शनिवारी संदीप गुळवे यांच्याकडून तर रविवारी किशोर दराडे यांच्याकडून नांदगाव व मनमाड या दोन्ही ठिकाणी पार्ट्या देण्यात आले या पार्टीत लाख रुपये पगार घेणाऱ्या शिक्षकांनी देखील कधी न मिळ आणि गटकन गिळ या म्हणी प्रमाणे दारू आणि मटणाचा आस्वाद घेतला अनेकांनी तर शनिवार होता तरी मटणावर येथच्च ताव मारला काही न तर क्वार्टर पार्सल घेऊन गेले तर काहींनी जे पित नाही त्यांच्या नावावर पार्सल घेऊन घरी नेले या सर्व प्रकारामुळे ज्याच्या हातात भावी पिढी घडवण्याची जबाबदारी असते तेच असे वागले तर काय देशाचे भवितव्य होईल याचा विचार न केलेलाच बरा शेवटी गुरुजी तुम्हीसुध्दा हे म्हणण्याची। वेळ आयोजकांवर आली.
पैठणी,नथ,पेन आणि पाकीट….?
या निवडणुकीत मतदान पक्के करण्यासाठी विविध प्रकारचे आमिष देण्यात आली काही उमेदवार यांनी पैठणी काहींनी नथ काहींनी पेन तर काहींनी पाकीट तर काही उमेदवार यांनी पैठणी पाकीट असे दोन्ही वस्तूची वाटप केली या सगळ्या गोष्टीत करोडो रुपयांची उलाढाल झाली मात्र या सगळ्या गोष्टीकडे निवडणूक आयोगाने अक्षरशः दुर्लक्ष केल्याचे चित्रही बघायला मिळाले.