ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख यांच्याकडे आढळला गांजा
पोलिसांकडून अटक, खोटा गुन्हा असल्याचा दावा, आज नांदगाव बंद
मनमाड। : आमिन शेख
-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांच्या दुकानात तालुक्याचे कार्यदक्ष तहसीलदार,पोलिस उपविभागीय अधिकारी दोन्ही मनमाड नांदगाव शहराचे पोलीस निरीक्षक यांच्यासह इतर कर्तव्यदक्ष प्रशासकीय यंत्रणेने धाड टाकली व याठिकाणी 7 ते 8 किलो गांजा मिळुन आल्याचा गुन्हा दाखल करून गुप्ता यांना अटक करण्यात आली मात्र हा खोटा गुन्हा असुन राजकीय द्वेषाची भावना ठेऊन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेच्या निषेधार्थ आज मनमाड व नांदगाव बंदची हाक सर्वपक्षीयांतर्फे देण्यात आली आहे.
नांदगाव तालुका हा शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्यात जातीवाद खालच्या पातळीवर राजकारण किंवा दडपशाही गुंडगिरी नव्हती मात्र आता तालुक्याला या सर्व गोष्टींची कीड लागली असुन याचा पहिला बळी उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संतोष गुप्ता हे ठरले आहे त्यांच्यावर गांजा बाळगल्या प्रकरणी खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेच्या निषेधार्थ नांदगाव शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने नांदगाव पोलिस ठाण्यात गर्दी केली व 25 जुन रोजी मनमाड व नांदगाव शहर कडकडीत बंद ठेवण्याची घोषणा केली मुळात गुप्ता यांना आखा तालुका ओळखतो संतोष गुप्ता असे कृत्य करूच शकत नाही असे मत तालुक्यातील जनतेने व्यक्त केले तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी यांनी दडपणात येऊन हा गुन्हा केला असल्याचा आरोप तालुक्यातील राजकीय नेत्यांनी केला आहे.