प.पू. आचार्य भगवंत पुण्यपाल सुरींचे महानिर्वाण
नाशिक | जैन धर्मियांचे विद्यमान गच्छाधीपती संघनायक व सुमारे २००० साधुसंताचे मुख्य प.पू. आचार्य भगवंत श्रीमद् विजय पुण्यपाल सुरीश्वरजी (७८) यांचे अल्पकालीन आजाराने मुलंड (मुंबई) वेस्ट विनानगर संघ उपाश्रयमध्ये महानिर्वाण झाले. नवकार महामंत्राचे स्मरण करता करता आज सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ७० वर्षापूर्वी वयाच्या ८ व्या वर्षी वणी जि. नाशिक येथे जैन धर्म शास्त्राप्रमाणे त्यांनी बालदीक्षा घेतली व अत्यंत अभ्यासपूर्ण अवस्थेत शास्त्रशुद्ध आचारण करून नावलाैकिक वाढविला. त्यांचे वडील आचार्य सुविशाल वात्सल्य निधी प.पू. आ.भ. महाबळ सुरीश्वरजी महाराज व आई जैन साध्वी प.पू. विमल किर्तीश्रीजी या दाेघांनी देखील दीक्षा घेतली व त्यांचे महानिर्वाण झाले. त्यांचे वणी नाशिक येथील चातुर्मास देखील गाजले व अलीकडेच नाशिक येथे प्राणप्रतिष्ठा साेहळा दीक्षा व अंजन शलाका महाेत्सव उपधानतप निविघ्नपणे पार पाडले. १ जानेवारी २०२५ राेजी नाशिक येथून विहार करून मुलुंड येथे प्रस्थान केले. त्यांच्या उपस्थितीत मुलुंड येथे मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा साेहळा २५ जानेवारी राेजी हाेणार हाेता व नाशिक येथे ३ दीक्षार्थींची माेठी दीक्षा देखील मुलंड येथे संपन्न हाेणार हाेती. त्यांच्या आकस्मित निधनाने जैन समाजातील तपागच्छ संघात अत्यंत दुखाचे वातावरण व शाेककळा पसरली आहे. नाशिकचे श्री. चिंतामणी जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ त्याचप्रमाणे वणी, सर्व संघातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांची पालखी व चढावे (बाेळी) सकाळी ९.३० वा. सुरु हाेणार असून अंत्ययात्रा सकाळी ११ वा. ऑबेराॅय इनीगमा, मुलुंड पश्चिम येथून निघणार आहे.