नाशिक, रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती, महाजन, तटकरे यांना मोठा धक्का

नाशिक, रायगडच्या
पालकमंत्रिपदाला स्थगिती
गिरीश महाजन, तटकरेंना मोठा धक्का

मुंबई :
राज्य सरकारकडून शनिवारी (दि.19) सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. मात्र, एकाच दिवसात दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे.
रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला सरकारने स्थगिती दिली आहे. पुढील आदेश येईपर्यंत या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदावर भाजपाचे गिरीश महाजन आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावर राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली होती. तर दादा भुसे यांना कुठेच संधी देण्यात आली नव्हती. तटकरे यांच्या नियुक्तीमुळे भरत गोगावले समर्थक कमालीचे नाराज झाले होते. काल रात्री उशिरा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे  यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात येत असल्याचे आदेश काढल्याने महाजन आणि तटकरे यांना मोठा धक्का बसला आहे.

सरकारने नव्या आदेशात काय काय म्हटलं आहे?
संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र राज्याचे  मंत्री आणि  राज्यमंत्री यांची राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री/सह-पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.उक्त शासन निर्णयाद्वारे करण्यात आलेल्या नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस पुढील आदेशापर्यंत, याद्वारे, स्थगिती देण्यात येत आहे.हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *