नाशिक

महापौरपदासाठी हिमगौरी आडकेंच्या नावावर शिक्कामोर्तब

उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप; भारतीय जनता पक्षाकडून घोषणा

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवणार्‍या भाजपने मंगळवारी (दि.3) महापौर, उपमहापौर पदाची नावे जाहीर केली. यात महापौरपदासाठी माजी स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके-आहेर, तर उपमहापौरपदासाठी माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप यांच्या नावावर शिक्कामोर्तब मंत्री गिरीश महाजन यांनी केले. दरम्यान, नावांची घोषणा करताच हिमगौरी आडके व मच्छिंद्र सानप यांनी महापालिकेत मंगळवारी दुपारी एक वाजून 40 मिनिटांनी पक्षातील ज्येष्ठ नेते व नगरसेवकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरले.
महापौर, उपमहापौर पदाचे अर्ज भरण्यासाठी आमदार राहुल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, गटनेते अ‍ॅड. श्याम बडोदे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, सुरेशअण्णा पाटील, गुरुमितसिंग बग्गा, शाहू खैरे, दिनकर पाटील, चंद्रकांत खोडे, प्रशांत दिवे आदींसह पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते. महापौरपदासाठी कुणाला संधी मिळणार यावरून भाजपमधील वातावरण गेल्या पंधरा दिवसांपासून चांगले तापले होते. दररोज वेगवेगळी नावे समोर येत होती.
दरम्यान, महापौर पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी जाहीर झाल्यापासून हिमगौरी आडके यांचे नाव सर्वांत अग्रभागी होते. भाजपने महापौर, उपमहापौरपदासाठी मराठा, ओबीसी कार्ड चालवल्याचे दिसतेे. विशेष म्हणजे, यापूर्वी गटनेतेपदी अ‍ॅड. श्याम बडोदे यांची केलेली नियुक्ती पाहता भाजपने महत्त्वाच्या पदांवर निवड करताना जातीय
समीकरणाचा मेळ घातल्याची चर्चा आहे. महापौरपदावर वर्णी लागावी याकरिता गेल्या पंधरा दिवसांत भाजपमध्ये जोरदार घडामोडी सुरू होत्या. भाजप पक्षश्रेष्ठींकडून कोणाच्याही नावावर शिक्कामोर्तब केले नसल्याने अनेकांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. काहींनी आपले वजन वापरत थेट मुंबईतील नेत्यांशी संपर्क साधला; परंतु पक्षाने महापौरपदासाठी हिमगौरी आडके व उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांची नावे घोषित केली.

यामुळे आडके यांच्या नावाला पसंती

महापौरपदासाठी हिमगौरी आडके-आहेर यांच्यासह दीपाली गिते, स्वाती भामरे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. पण हिमगौरी आडके यांनी यापूर्वी स्थायी समितीचे सभापतिपद सांभाळले असून, प्रशासनाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यातच दोन वर्षांनी शहरात सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. अशावेळी प्रशासनाची बाजू जोरकस मांडणे महत्त्वाचे असेल. यात आडके या उजव्या ठरल्या. त्यामुळेच पक्षाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे दिसलेे.

माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, तसेच पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानते. पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवेन. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात उत्तम सुविधा देण्यासाठी, तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करेन. महापालिकेतील लोकाभिमुख प्रशासन, पारदर्शक कारभार आणि जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्यावर माझा भर राहील. पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. मिळालेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन. जनतेची व गोदामायेची सेवा, हे माझे प्रथम ध्येय राहील.
-हिमगौरी आडके-आहेर, भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार

Himgauri Adke’s name confirmed for the post of mayor

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

11 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

11 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

11 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

12 hours ago