नाशिक

पांगरीत मका व चार्‍याला आग; सव्वा लाखाचे नुकसान

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील पांगरी येथे विजेच्या तारांमध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणग्यांमुळे शेतकर्‍याच्या शेतातील मका व चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना सोमवारी दुपारी पाचच्या सुमारास घडली. या आगीत सुमारे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
पांगरी-धारणगाव रस्त्यालगत सोमनाथ बाजीराव निरगुडे यांची वस्ती असून, त्यांनी शेतात मका पीक घेतले होते. पीक काढणीनंतर शेतातील खळ्यात पाच ते सहा ट्रॅक्टर चारा तसेच त्याशेजारी तीन ते चार ट्रॅक्टर मक्याच्या बिट्ट्या साठवून ठेवण्यात आल्या होत्या. सोमवारी दुपारी शेतातून जाणार्‍या विजेच्या तारांमध्ये पक्ष्यांमुळे घर्षण होऊन ठिणग्या खाली पडल्या आणि गवताला आग लागली. ही आग वेगाने पसरत चारा व मक्याच्या बिट्ट्यांपर्यंत पोहोचली.
घटनेच्या वेळी शेतात कोणीही नसल्याने नुकसान वाढले. रस्त्याने जाणार्‍या नागरिकांच्या लक्षात आग येताच त्यांनी तात्काळ निरगुडे यांना माहिती दिली. त्यानंतर रस्त्याच्या कामावर असलेला टँकर व जेसीबीच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. परिसरातील शेतकर्‍यांनीही धाव घेत काही प्रमाणात बिट्ट्या वाचवण्यात यश मिळवले.
दरम्यान, सिन्नर नगरपरिषदेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत निरगुडे यांचे सुमारे सव्वा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Fire breaks out in maize and fodder fields in Pangri; Loss of Rs. 1.25 lakh

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

4 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

4 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

4 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

4 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

4 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

4 hours ago