नाशिक जिल्ह्यात निफाड, मनमाड, मालेगाव, येवला, चांदवड, दिंडोरीत आंदोलन
नाशिक : प्रतिनिधी
शालेय जीवनात पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करणार्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात जिल्ह्यात रविवारी (दि. 29) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. हिंदी भाषेच्या सक्ती करणार्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली. महायुतीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मराठी भाषा व संस्कृतीच्या अस्मितेसाठी हे आंदोलन उभारण्यात आले. हिंदीसक्ती ही राज्यातील मातृभाषेच्या अधिकारांवर गदा आणणारी ठरते, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
निफाडमध्ये निदर्शने
निफाड : माजी आमदार अनिल कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन आहेर, ज्येष्ठ नेते भास्कर बनकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून येथील शिवाजी चौकात हिंदीसक्ती विरोधात निदर्शने करत अध्यादेशाची होळी केली. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांतर्फे पोलीस उपनिरीक्षक ईश्वर पाटील यांना अनिल कदम, भास्कर बनकर, नितीन
आहेर, दिगंबर गिते यांनी निवेदन दिले.आंदोलनास ज्येष्ठ नेते भास्करराव बनकर, वैशालीताई कदम, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, आशिष शिंदे, निफाड शहरप्रमुख संजय धारराव, करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके पाटील, नगरसेवक मुकुंद होळकर, बापूसाहेब कुंदे, सुनील निकाळे, निरज चोरडिया, कैलास धारराव, सुभाष आवारे, शंकर संगमनेरे, पंडित आहेर, आशिष बागूल, ललित गिते, आबा गडाख, भाऊसाहेब केदार, राष्ट्रवादीचे इरफान सय्यद, भूषण शिंदे, अमोल दाते, अरुण डांगळे, किरण सूरवाडे, संतोष आहेर, प्रकाश वाटपाडे, नितीन काळे, प्रकाश महाले, सुनील कदम, रमेश जेऊघाले, महेश क्षीरसागर, समाधान वाघ, राहुल नागरे, तुकाराम उगले, दादा बोरगुडे, शिवाजी तळेकर, काँग्रेसचे दिगंबर गिते, सुहास सुरळीकर, सचिन खडताळे, नईम शेख, दत्तू भुसारे, संतोष बाजारे, रघुनाथ ढोबळे, भाऊसाहेब खालकर, छगन नागरे, श्रीजीत कदम, बाळासाहेब खताळे, योगेश राजोळे, गणपत भगुरे, दिनकर निकम, सुबोध व्यवहारे, मनसेचे तालुकाध्यक्ष तुषार गांगुर्डे, शैलेश शेलार, अब्दुल शेख, सुयोगराव गायकवाड, अमोल निचित, संदीप धोत्रे, जयेश ढिकले, गणेश कदम, प्रमोद दराडे, आप्पा राजोळे, नितीन निकम, आयुष निकम आदी उपस्थित होते.
मनमाडला निवेदन
मनमाड : शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे
दुपारी बाराच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांंच्या पुतळ्यास हार अर्पण करून आंदोलन करण्यात आले. शासनाने हिंदीसक्ती करण्यासाठी जो निर्णय काढला त्या निर्णयाची होळी केली. हिंदी सक्तीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी केली. आंदोलनात ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रवीण नाईक, मनमाड शहराध्यक्ष माधव शेलार, जिल्हा समन्वयक सुनील पाटील, तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, महिला आघाडीप्रमुख मुक्ता नलावडे, पप्पू शिंगारे, पप्पू सूर्यवंशी, प्रकाश चावरिया, रवी इप्पर, रवी अमराळे, अशोक पदमर, विनय
आहेर, अतुल साबळे, राजाभाऊ वाघ आदी सहभागी झाले होते.
मालेगावला मोर्चा
मालेगाव : शालेय जीवनात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करणार्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाविरोधात मालेगावात रविवारी (दि.29) सर्वपक्षीय निषेध आंदोलन करण्यात आले. येथील शिवसेना भवन (समाजश्री प्रशांतदादा हिरे व्यापारी संकुल) येथून निघालेला भव्य मोर्चा मोसमपूल येथील
महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत पोहोचताच शासन आदेशाच्या प्रतीची होळी करून संताप व्यक्त केला. यावेळी पवन ठाकरे, सुरेश गवळी, नाना शेवाळे, जितू देसले, शुभम खैरनार, प्रेम माळी आदींनी दिला. यावेळी पोलिसांना निवेदन दिले.
आंदोलनात किशोर निकम, नंदलाल शिरोळे, अशोक आखाडे, जीवन हिरे, गोविंद खैरनार, शंकर निकम, जितेंद्र राऊत, गोरख बच्छाव, लक्ष्मण शेलार, संदीप अभोणकर, दादासाहेब बच्छाव, प्रशांत अहिरे, युवराज गोलाईत, प्रशांत शेवाळे, प्रवीण सोनवणे, बापू शिंदे, नारायण चव्हाण, संजय भदाणे, अर्जुन भाटी आदी सहभागी झाले होते.
येवल्यात होळी
येवला ः शहरात शिवसेना उबाठातर्फे हिंदी सक्तीच्या अध्यादेशाची (जीआर) होळी करत निदर्शने करण्यात आली. यावेळी शहरप्रमुख संजय कासार, वाल्मीक गोरे, छगन आहेर, युवासेना तालुकाप्रमुख संतोष गोरे, युवासेना समन्वयक लक्ष्मण गवळी, युवासेना शहरप्रमुख माँटी मथुरे, शिवसेना उपशहरप्रमुख अमित अनकाईकर, उपशहरप्रमुख दीपक भदाणे, महेश सरोदे, भाऊ भागवत, गणेश वडनेरे, इरफान शेख, अरुण शेलार, किशोर पवार, नितीन पिंपळे, जनार्दन शेलार व शिवसैनिक उपस्थित होते.
चांदवडला आंदोलन
चांदवड ः शासन निर्णयाविरोधात (जीआर) रविवारी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख नितीन आहेर,
तालुकाप्रमुख विलास भवर व शहरप्रमुख प्रसाद प्रजापत यांच्या नेतृत्वाखाली या निर्णयाची होळी करण्यात आली. आंदोलनात सचिन (गुड्डू) खैरनार, सागर बर्वे, सुरेश सोनवणे, मनोज जाधव, तोफिक शेख, अकबर पठाण, धीरज संकलेचा, सौरभ देशमाने, विष्णू कोतवाल, साहेबराव चव्हाण, राजूभाऊ शिंदे, ज्ञानेश्वर आवारे, सोमनाथ सोनवणे, शरद शिंदे, वसंत झेंडफळे, गोरख शिंदे आदी उपस्थित होते.
दिंडोरीत होळी
दिंडोरी : राज्य सरकारने पहिलीपासून शाळेत हिंदीसक्ती केल्याच्या निषेधार्थ दिंडोरी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अध्यादेशाची होळी केली. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख सतीश देशमुख, योगेश बर्डे, तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे, डॉ. विलास देशमुख, संतोष मुरकुटे, नदीम सय्यद, किरण कावळे, अरुण गायकवाड, नीलेश शिंदे, संगम देशमुख, उत्तमराव जाधव आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…
धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…
चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…
सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…
पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…
अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…