महापुरुषांचे पुतळे स्वच्छतेसाठी सेवकाची नियुक्ती करा
रिपब्लिकन संघर्ष आघाडीची मागणी
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील महापुरुषांचे स्मारके व पुतळे अस्वच्छ असून त्यांच्या भोवती घाणीचे साम्राज्य दिसून येते. त्यामुळे महापुरुषांचे पुतळे व परिसर कायम स्वछता ठेवण्यासाठी महापालिकेने अशा ठिकाणी कायमस्वरूपी स्वच्छता सेवकाची नेमणूक करावीm अशी मागणी रिपब्लिकन संघर्ष आघाडी महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे सोमवारी (दि.16) निवेदनाद्वारे केली.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले कीं, शालीमार येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा व छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व शहरातील सातपुर राजवाडा पुर्णकुर्ती पुतळा व छत्रपती शिवाजी महाराज मंडई सातपुर येथील शिवाजी महाराज पुतळा असे विविध भागातील पुतळे व परिसर स्वच्छ करावा. यामुळे नाशिकच्या सौदर्यात वाढ होईल. याकरीता आपण तात्काळ निर्णय घेवुन आमच्या मागणीचा विचार करावा. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी अध्यक्ष प्रकाश पगारे, उपाध्यक्ष मदन शिंदे, सनी रोकडे, भिवानंद काळे, कार्याध्यक्ष सुनील कांबळे, दिलीप अहिरे, भारत रोकडे, अतुल भवसार, संजय सानप, मुस्ताक शेख आदी सह उपस्थित होते.
घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले अन नंतर केले असे काही... नाशिक: …
काँग्रेस मेळावा नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा…
कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभोणा उपबाजारात शेतकर्यांंनी गुरूवारी सुमारे 700 ट्रँक्टर मधून 15 हजार…
नाशिक : प्रतिनिधी गेल्या तीन चार महिन्यांपासून हा तिकडे चालला तो तिकडे चालला अशा अफवा…
नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला होता.आगामी स्तानिक स्वराज संस्थेच्या…
नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला…