चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय

चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय

अनेकांना अंगावर चामखीळ येतात. काहींना ते अधिक प्रमाणात येतात तर काहींना काही थोड्या प्रमाणात येतात. चामखीळवर काही घरगुती उपाय करू शकतात. सफरचंदचं व्हिनेगर चामखिळीची समस्या मुळापासून दूर करण्यासाठी सफरचंदचं व्हिनेगर अधिक फायदेशीर ठरतं. रोज कमीत कमी 3 वेळा कापसाने चीमखिळीवर हे व्हिनेगार लावा. काही दिवसांतच चामखिळीचा रंग बदलून ते नष्ट होईल.
लिंबाचा रस
लिंबाचा रस चामखिळीवर लावल्याने देखील याची समस्या दूर होते.
बटाट्याचा रस
बटाट्याचा रस किंवा बटाटा बारीक करून चामखिळीच्या जागी लावल्याने देखील ते हळूहळू कमी होण्यास मदत होते.
अननसाचा रस
चामखिळीपासून सुटका मिळण्यासाठी अननस रस, कांद्याचा रस आणि मध एकत्र करून लावावे.
बेकिंग सोडा
चांगल्या त्वचेसाठी फायदेशीर असलेला बेकिंग सोडा चामखिळीवर देखील फायदेशीर ठरतो. बेकिंग सोडा एरंडीच्या तेलामध्ये टाकून पेस्ट तयार करा आणि चामखिळीवर ती पेस्ट लावा. लसणाचं सेवन अनेक समस्यांपासून लांब राहण्यासाठी महत्त्वाचं आहे. सुंदरतेसाठी देखील लसूण तेवढाच फायदेशीर आहे. लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून ते चामखिळीवर लावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *