माजी मंत्री बबन घोलप यांची घरवापसी
नाशिक: प्रतिनिधी
शिर्डी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटात गेलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांनी मुलगा योगेश घोलप यांना ठाकरे गटाने उमेदवारी देताच पुन्हा ठाकरे गटात वापसी केली. शिंदे गटाचा राजीनामा देत त्यांनी मातोश्रीवर जात पुन्हा शिवबंधन बांधून घेतले. देवळाली मतदार संघातील लढत निश्चित झाली असून योगेश घोलप यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे.तर अजित पवार गटाने विध्यमान आमदार अहिरे यांना उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री घोलप हे आज मातोश्रीवर गेल्यावर त्यांनी शिवबंधन बांधले. यावेळी दत्ता गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते