निफाड: प्रतिनिधी
जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे. शहरात आज वेगवेगळ्या भागात दोन खुन झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच अल्पवयीन मुलीवर दोन नराधमानी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघड झाल्याने संताप व्यक्त होत आहे. निफाड तालुक्यातील खेरवाडी येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले असून कोणाला काही सांगितले तर तुझ्या भावाला मारून टाकू, शाळेत तुझी बदनामी करू अशी धमकी दिली या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . या प्रकरणी पोलीसांनी दोघा नराधमांना अटक केली आहे. समाधान संगमनेरे राहणार खेरवाडी व संतोष उर्फ केदु उर्फ केरू बेंडकुळे राहणार खेरवाडी अशी दोन्ही नराधमांची नावे आहेत. शेजारी राहत असलेल्या अल्पवयीन मुलीला घरी बोलवून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घडना उघड झाली आहे.
याप्रकरणी पोलीस अधीक्षक सचिन पाटील, पोलीस उपाधिक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनानुसार सायखेडा पालीस ठाण्यात भा द वि कलम 376(ड),376(ड) (अ),452,506,34 लैगिंक अपराधपासून बालकांचे संरक्षण अधिनियमन 2012 चे 4 व 6 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.वाय.कादरी तपास करत आहेत.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…