शनिवार, २४ डिसेंम्बर २०२२.

पौष शुक्ल प्रतिपदा,

हेमंत ऋतू.

राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०

“आज चांगला दिवस आहे”

चंद्रनक्षत्र: पूर्वाषाढा

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस आहे. स्वतःच्या सुखासाठी खर्च कराल. अचानक धनलाभ होईल. प्रवास घडतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) धनलाभाचा दिवस आहे. कामाला लागा. फार घाई करू नका. निर्णय घेताना योग्य सल्ला घ्या. आरोग्याची काळजी मात्र घ्या.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रेमात यश मिळू शकते. जोडीदाराला समजून घ्या. योग्य सल्ला घ्या. वक्तृत्व बहरेल. गप्पांमधून नवीन ओळखी होतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक प्राप्ती चांगली होत आहे. कर्जे मंजूर होतील. आर्थिक तणाव मिटेल. यश मिळेल धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. गुपिते उघड करू नका.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कुटुंबासाठी कष्ट घ्याल. अपत्यांकडून शुभ समाचार समजेल. संवादातून प्रश्न सुटतील. स्पर्धेत यश मिळेल. महत्वाची कामे पुढे ढकलली जातील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम लाभ होतील. आर्थिक घडी बसेल. मेजवानी मिळेल. आनंदी राहाल. भौतिक सुखे लाभतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सुखाचा दिवस आहे. संधीचे सोने कराल. कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील. शुभ समाचार मिळू शकतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) वक्तृत्व बहरेल. कलाकारांना उत्तम संधी मिळतील. खर्चात वाढ होईल. आर्थिक तजवीज होईल. येणी वसूल होतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आवडते छंद जोपासाल. मनासारखा दिवस व्यतीत कराल. सकाळी कामे मार्गी लागतील. धार्मिक पर्यटन घडेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक लाभ होतील. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. राजकारणात वाटचाल कराल. त्यासाठी खर्च करावा लागेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उत्तम दिवस आहे. आर्थिक प्राप्ती भरपूर होईल. गुंतवणुकीस चांगला कालावधी आहे. वेळ दवडू का. महत्वाची कामे आज पूर्ण करा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) बरीचशी कामे आज मार्गी लागतील. अडचणी दूर होतील. मन काहीसे चिंतातुर राहील. उपासना केल्यास सौख्य लाभेल

मंगेश पंचाक्षरी –

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

8 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago