बांधकाम व्यावसायिकांना गरज लागल्यास स्वामीह फंडतातून मदत

 

 

स्वामीह फंडाचे चिफ फायनान्स ऑफिसर इरफान काझी यांचे आश्वासन

नाशिक : प्रतिनिधी ‘स्वामीह फंड ‘ हा केंद्र सरकारचा रियल इस्टेट प्रकल्पात मदत करण्यासाठीच उभारण्यात आलेला फंड असून त्याचे देशभरातील अनेक बांधकाम प्रकल्पांना मोठे सहकार्य लाभत आहे. या फंडातून अर्धवट राहिलेले गृहप्रकल्प तसेच अडचणीत आलेले आणि रखडलेले गृहप्रकल्प पूर्ण करता येऊ शकतात, असे प्रतिपादन स्वामीह फंडाचे चिफ फायनान्स ऑफिसर इरफान काझी यांनी केले.

 

 

तसेच नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक आणि विकासकांना काही अडचणी बांधकाम व्यावसायिक व विकासकांना कोणतीही अडचण आल्यास स्वामीह फंडातून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

 

 

सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे दि. २२ ते २५ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ असे चार दिवसांचे ‘होमेथॉन प्रदर्शन ‘ नाशिक शहरातील गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे सुरू असून यानिमित्त दि. २३ रोजी प्रथम सत्रात आयोजित बांधकाम व्यवसायिक आणि विकासकांच्या परिसंवादात इरफान काझी बोलत होते.

 

 

यावेळी इरफान काझी यांनी सांगितले की, रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांची पूर्तता करण्यासाठी आणि घर खरेदीदारांना अपार्टमेंटची वितरण सुनिश्चित करण्यासाठी वित्तपुरवठा करणे हा स्वामीह हा फंडाचा मुख्य उद्देश आहे. तसेच हा फंड रिअल इस्टेट क्षेत्रातील तरलता निर्माण करण्यात मदत करते आणि सिमेंट आणि स्टील सारख्या प्रमुख उद्योगांना चालना देतो. तसेच या फंडातून १२ टक्के व्याज दराने पैसे देण्यात येतात. तसेच प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणारी जवळजवळ सर्व पैशांचे व्यवस्था यासाठी मिळते. गृह प्रकल्पाच्या एकूण खर्च पैकी कमीत कमी ३० टक्के खर्च झालेला असेल तर असा गृहप्रकल्प या फंडातील कर्ज मिळण्यासाठी योग्य ठरू शकतात, असेही काझी यांनी स्पष्ट केले.

 

 

यावेळी बोलताना काझी पुढे म्हणाले की, भारतात सुमारे साडेचार लाख युनीट प्रकल्प थांबलेले आहेत. त्यापैकी १ लाख ७२ हजार युनीट प्रकल्पाला मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकल्पाला १५ कोटी पासून ४०० कोटी पर्यंत मदत स्वामी हा फंडातून करण्यात येते. नाशिकमधील आतापर्यंत चार ते पाच डेव्हलपर्स यांनी संपर्क साधला आहे. तसेच इतर विकासकांना काही अडचणी असल्यास त्यांनी स्वामी हा फंडासाठी अर्ज करावा, अशी आवाहनही त्यांनी केले.

 

 

याप्रसंगी नरेडको नाशिकचे अभय तातेड, नरेडको सचिव सुनील गवादे, होमेथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर , होमेथॉनचे सहसमन्वयक शंतनु देशपांडे यांच्या हस्ते इरफान काझी विनीत चांडक अमित मकवाना आदींसह मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अभय साखरे यांनी केले.

 

 

याप्रसंगी राजन दर्यानी, नरेश कारडा, सुनील भायभंग, डी.जे. देसवाणी, विपुल नेरकर, मर्जीन पटेल, चेतन पटेल, रवींद्र पाटील, रवींद्र धनाईत,भाविक ठक्कर,प्रशांत पाटील, विपुल पोद्दार,

आदिंसह मान्यवर उपस्थित होते.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

12 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

12 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

12 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

12 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

12 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

13 hours ago