शुक्रवार, १३ जानेवारी २०२३.

पौष कृष्ण शष्टी, हेमंत ऋतू. शुभकृत नाम संवत्वर

राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००

“आज संध्याकाळी ६.०० अपर्यंत चांगला दिवस.”

चंद्रनक्षत्र: उत्तरा (दुपारी ४.३५ पर्यंत) /हस्त.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. प्रवासात काळजी घ्या.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामे मार्गी लागतील. मात्र प्रतिष्ठा पणास लागेल. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सांभाळा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मानसिक स्वास्थ्य लाभेल. घरात वेळ व्यतीत कराल. अचानक धनलाभ संभवतो.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभदायक दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. कामे मार्गी लागतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्च वाढवणारा दिवस आहे. कोणताही करार करताना अधिक काळजी घ्या. आर्थिक नियोजन कोलमडेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) चैनीवर खर्च कराल. मन प्रसन्न राहील. मित्र मंडळी भेटतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) काळजी वाढवणारा दिवस आहे. छंद जोपासा. आगीपासून सावध रहा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लाभदायक दिवस आहे. आवडत्या व्यक्ती भेटतील. उष्णतेचा त्रास जाणवेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामाच्या ठिकाणी वादविवादाचे प्रसंग येतील. जबाबदारी वाढेल. चूक टाळा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) गैरसमज होऊ देऊ नका. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. अभ्यासात यश मिळेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कामाचे कौतुक होईल. मान सन्मान मिळतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) भावना व्यक्त करा. मन मोकळे करा. जीवनाचा आनंद घ्या. विवाह इच्छुकांना खुशखबर मिळेल.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

16 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

18 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

20 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

20 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

20 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

21 hours ago