महाराष्ट्र

दुचाकी झाडावर आदळून दोघे ठार

सातपूर: प्रतिनिधी

ट्रीपल सीट मोटारसायकल झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन जण ठार, तर एक जण जखमी झाल्याची घटना एबीबी सर्कलनजीक घडली.
याबाबत गंगापूर पोलीस ठाण्याचे हवालदार विजय खैराते यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की  विशाल संजय मराठे (वय २०, रा. मु. पो. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) हा   एमएच १५ जीपी ६२०४ या क्रमांकाची मोटारसायकलवरून काल एबीबी सर्कलकडून सिटी सेंटर मॉलकडे ट्रीपल सीट जात होता. ही भरधाव मोटारसायकल लक्षिका लॉन्सच्या समोर दुभाजकाजवळ असलेल्या झाडावर जाऊन आदळली.

या अपघातात दुचाकीचालक विशाल मराठे याच्यासह मागे बसलेला विष्णू प्रमोद जोशी (वय १८) हे दोघे जण ठार झाले, तर त्यांचा तिसरा साथीदार हर्षल रवींद्र शिरसाठ (वय २२, रा. श्रमिकनगर, सातपूर) हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरिक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बैसाणे करीत आहेत.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

9 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

10 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

10 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

10 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

10 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

10 hours ago