सोमवार, १६ जानेवारी २०२३.
पौष कृष्ण नवमी, हेमंत ऋतू.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
आज करिदिन. घबाड संध्याकाळी ७.२३ नंतर.
चंद्र आज राहूच्या ‘स्वाती’ नक्षत्रात तुळ राशीत आहे.
मेष:- विवाह इच्छुकांना शुभ समाचार येण्यासाठी काहीशी वाट बघावी लागेल. भागीदारी व्यवसायात वाद निर्माण होऊ शकतात. कुटुंबास वेळ द्याल.
वृषभ:- आर्थिक फायदा होईल. दीर्घकाळ लाभ देणारे निर्णय घ्याल. महत्वाची कामे आज पूर्ण करा. वादविवाद टाळा. व्यसने नकोत.
मिथुन:- स्पर्धेत यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. जवळचे प्रवास घडतील. मुलांशी विसंवाद टाळा. शेजारी संवाद साधा. नात्यातून लाभ होतील.
कर्क:- गृहसौख्य लाभेल. जेष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. विनाकारण वाद होऊ देऊ नका. कर्जे मंजूर होतील. जमिनीचे व्यवहार होतील.
सिंह:- धनलाभदायक दिवस आहे. बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल. सन्मान मिळतील. कठोर बोलणे टाळा. तात्विक वाद होतील.
कन्या:- खर्चात वाढ होईल. विनाकारण त्रास संभवतो. मन शांत ठेवा. फारशी अनुकूलता नाही.
तुळ:- आत्मविश्वास वाढेल. कामात मन रमेल. बौद्धिक कामातून आनंद मिळेल. मेजवानी मिळेल. चर्चासत्रात भाग घ्याल.
वृश्चिक:- चुका टाळा. सरकारी कायदे काटेकोर पाळा. उपासना करा. वाहन जपून चालवा. व्यसने टाळा. अन्यथा नुकसान संभवते.
धनु:- उत्तम दिवस आहे. सामाजिक वजन वाढेल. मन प्रसन्न राहील. सौख्य लाभेल. मनासारखी कामे होतील. सातत्य राखले जाईल.
मकर:- मान सन्मान वाढेल. जबाबदारीत भर पडेल. वाद संभवतात. नवीन जबाबदारी अंगावर येईल. सहकारी विनाकारण त्रास देतील.
कुंभ:- अचानक धनलाभ संभवतो. भाग्य उजळेल. जेष्ठ नातलगांकडून फायदा होईल. गुंतवणूक करताना योग्य खबरदारी घ्या. आळस नको.
मीन:- आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. महत्वाचे काम आज नको. विश्रांती घ्या. छोटी सहल घडेल.
. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)
Devyani Sonar

Recent Posts

साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज

गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…

2 days ago

जुने नाशिक भागात आमदार फरांदे यांनी साधला सवांद

नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी  आल्याने…

2 days ago

नांदगावमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये राडा

नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…

2 days ago

यांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…

2 days ago

जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान

  जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…

2 days ago

बनकर, कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क

निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…

2 days ago