५ एप्रिल रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर बुधाचा प्रभाव असल्याने तुम्ही अत्यंत बुद्धिमान आहात. तुम्हाला भरपूर बोलण्याची, बोलताना हातवारे करण्याची सवय असते. दर्जा नियंत्रण म्हणजेच क्वालिटी कंट्रोल मध्ये तुम्ही तज्ञ असतात. तुम्हाला खेळण्याची हौस आहे आणि तुम्ही समाजप्रिय आहात. नवनवीन गोष्टी करून बघणे तुम्हाला आवड असते. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तुम्ही तिला यशस्वीपणे तोंड देऊ शकतात. मित्रां बद्दल तुम्हाला प्रेम आहे आणि तुम्ही त्यांच्यासाठी लढायला तयार असतात. दुर्बल लोकांबद्दल तुम्हाला दया वाटते. लहान मुले, प्राणी, निसर्ग तुम्हाला प्रिय आहे. तुम्हाला शास्त्राची आवड असते. तुमची वृत्ती व्यापारी असून तुम्ही वेगाने काम करू शकतात. एखाद्या कामाचे पूर्वनियोजन कसे करावे याचा तुम्ही वस्तुपाठ घालून देऊ शकतात. गुढ विद्यांची तुम्हाला आवड असते. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आणि कार्यक्षम आहे. तुम्हाला आळशीपणा आवडत नाही. जीवनाकडे तुम्ही संयमाने बघतात आणि तुमच्या सहकाऱ्यांना त्यांच्या चुकीबद्दल तुम्ही नेहमी माफ करतात. धर्म, शास्त्र, तत्त्वज्ञान आणि कला यांचे तुम्हाला आवड असते. प्रिय व्यक्ती साठी तुम्ही अधिक खर्च करतात. बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे.
व्यवसाय:- डिपार्टमेंटल स्टोअर, उच्च अधिकारी, अकाउंट, वकील, व्यवस्थापक, वाद-विवाद पटू, खाजगी सचिव.
शुभ दिवस:- बुधवार, शुक्रवार, शनिवार.
शुभ रंग:- हिरवा.
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
बुधवार, ५ एप्रिल २०२३. चैत्र शुक्ल चतुर्दशी. शोभननाम संवत्सर
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
आज सकाळी ९.०० पर्यंत चांगला दिवस आहे. चंद्रनक्षत्र – उत्तरा फाल्गुना. आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अधिकारवाढतील. कामाची गती वाढेल. अनपेक्षित लाभ होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संत्तीशी मतभेद संभवतात. कामे मात्र मार्गी लागतील. मेहनत वाढवावी लागेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) घरात वादविवाद टाळा. मनाचा गोंधळ होईल. योग्य सल्ला घ्या.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) भावंड नाराज होऊ शकतात. आर्थिक लाभ होतील. प्रवासात त्रास संभवतो. काळजी घ्या. व्यसने नकोत.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कठोर बोलणे टाळा. अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आत्मविश्वास वाढेल. मात्र जोडीदाराशी वाद संभवतात. कामाच्या ठिकाणी मतभेद टाळा.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) खर्चत टाकणारा दिवस आहे. आत्मविश्वास कमी होईल. उपासना करा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) जबाबदारी वाढेल. अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामाच्या ठिकाणी चिडचिड होऊ शकते. शक्यतो गुपित उघड करू नका. मतभेद टाळा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) दूरचे प्रवासात त्रास होऊ शकतात. हातून लेखन घडेल. प्रगती होईल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आरोग्य सांभाळा. आर्थिक संकट जाणवेल. योग्य नियोजन करा. वाहन जपून चालवा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) जोडीदाराशी वा होऊ शकतात. भागीदारी व्यवसायात शंका निर्माण होतील.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…