राशिभविष्य

बुधवार, १८ मे २०२२. वैशाख कृष्ण तृतीया. वसंत ऋतू. शुभकृत नाम संवत्सर.

राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०

“आज प्रतिकूल दिवस आहे”

चंद्रनक्षत्र: जेष्ठ / मूळ

 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक प्राप्ती चांगली होईल. नात्यातून लाभ होतील. दूरचे प्रवास ठरवाल. जेष्ठ नातेवाईक मदत करतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) जबाबदारी वाढेल. धावपळ होईल. आरोग्य सांभाळा. वाहने जपून चालवा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) भ्रमंती घडेल. गैरसमज टाळा. जोडीदाराला विश्वासात घ्या. वादविवाद नकोत.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. आर्थिक लाभ होतील. मात्र कामाचा ताण वाढेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) छंद जोपासाल. मुलांशी संवाद साधा. प्रेमात धोका संभवतो. क्रोध आवरा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) स्पर्धेत यश मिळेल. नात्यात कटुता येऊ देऊ नका. गृह कलह टाळा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक प्राप्ती चांगली होईल. गुंतवणूक वाढेल. दीर्घकालीन नफ्याचे करार होतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) विनाकारण शत्रुत्व होऊ शकते. कमी बोला. मन खंबीर ठेवा. आर्थिक फसवणुकीची शक्यता आहे.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्मविश्वास कमी होईल. अंतर्मुख व्हाल. प्रवासात त्रास जाणवेल. वाहन जपून चालवा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) चोरांपासून धोका संभवतो. आरोग्य सांभाळा. खर्चात वाढ होईल. राजकीय क्षेत्रात जपून पाऊल टाका.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक यश मिळेल. व्यवसायात वाढ होईल. आनंदी राहाल. मात्र संयम ठेवावा लागेल. येणी रेंगाळतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) वरिष्ठ नाराज होतील. विनाकारण त्रास संभवतो. आर्थिक बाबतीत सावध रहा..

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *