शनिवार, २१ मे २०२२. वैशाख कृष्ण षष्ठी. वसंत ऋतू. शुभकृत नाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज दुपारी ३.०० पर्यंत चांगला दिवस आहे” आज ‘ब्रह्मा’ योग आहे.
चंद्रनक्षत्र – श्रवण
मेष:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. मनःशांती लाभेल. अधिकारात वाढ होईल. प्रवासातून लाभ होतील.
वृषभ:- उत्तम लाभाचा दिवस आहे. मन आनंदी राहील. राजकीय मतभेद टाळा.
मिथुन:- अनामिक भीती दाटून येईल. ग्रहमान संमिश्र आहे. आरोग्य सांभाळा. प्रवास टाळा.
कर्क:- प्रेमात यश मिळेल. आनंदी रहाल. स्वप्ने पूर्ण होतील. संवादातून माने जिंकाल.
सिंह:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. दगदग वाढेल. मात्र उत्तम यश मिळेल. अकल्पित लाभ होतील.
कन्या:- कामात अडथळे येत आहेत. मानसिक त्रास जाणवेल. उपासना केल्यास लाभ मिळतील.
तुळ:- आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष नको. प्राण्यांपासून सावध रहा. दैवी उपासना आवश्यक आहे.
वृश्चिक:- उत्तम लाभ होतील. मानसिक समाधान लाभेल. शत्रू पराभूत होतील. यश मिळेल.
धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. कुटुंबास समजून घ्या. मन शांत ठेवा.
मकर:- आप्त भेटतील. आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. वक्तृत्व चमकेल.
कुंभ:- संमिश्र दिवस आहे. उदास राहू नका. अध्यात्मिक प्रगतीस उत्तम कालावधी आहे.
मीन:- आर्थिक प्राप्ती मना सारखी होईल. सर्वार्थाने प्रगती करणारा दिवस आहे. उत्साह वाढेल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी