त्रंबकेश्वर: येथील संत निवृत्तीनाथ महाराज मंदिरवर बसविण्यात येणाऱ्या सुवर्ण कलशाचे पूजन आज संस्थांनच्या माजी विश्वास्थांच्या हस्ते करण्यात आले,
सर्व माजी विश्वस्त सुवर्णं कलश पूजन ब्राम्हवृंदा करवी मंत्र घोषमध्ये सुवर्णं कलश पूजन झाले.तसेच पंचांग कर्म,अग्नी स्थापन आणि ग्रह होम इत्यादी करण्यात आले,
.20,21 व 22 मे अशी तीन दिवस पूजा होणार.त्यात नूतन मंदिर वास्तू शांती पूजन व सुवर्णं कलश स्थापना होणार. 22 मे रोजी भाविकांच्या उपस्थितीत सुवर्णं कलश स्थापना व ध्वज दंड स्थापन होईल.गेल्या कित्येक वर्षांपासून लाखो भाविकांची इच्छा पूर्ण झाली. नाथांच्या मंदिराचा सुवर्णं कलश पाहून असुलेलं अंतःकरण,आतुरलेले डोळे तृप्त होणार अशी भावना पंडित महाराज कोल्हे यांनी व्यक्त केली, या वेळी माजी अध्यक्ष पंडित महाराज कोल्हे, पुंडलिक थेटे लांडे ,मुलाने आदी उपस्थित होते.