राशिभविष्य

मंगळवार, ३१ मे २०२२.
जेष्ठ शुक्ल प्रतिपदा. ग्रीष्म ऋतू. शुभकृत नाम संवत्सर.

राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

“आज करि दिन आहे” आज ‘धृती’ योगआहे.

चंद्रनक्षत्र: रोहिणी

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल. छोटे प्रवास घडतील. विक्री व्यवसायात वाढ होईल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कठोर भूमिका घ्याल. चैनीवर खर्च कराल. वरिष्ठची मर्जी सांभाळा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कामात अडथळे येतील. नियोजन चुकेल. खर्च वाढेल. महत्वाची कामे आज नकोत.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल दिवस आहे. सुखकारक घटना घडतील. उष्णतेचा त्रास जाणवेल. उपासना लाभदायक ठरेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उद्योग व्यवसायात वाढ होईल. नेहमीची कामेचालू ठेवा. जबाबदारी वाढेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) घरातील जेष्ठ व्यक्तीची काळजी घ्या. प्रवास टाळा. शिक्षणात अडथळे येतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) चोरीचे भय आहे. मनावरील ताण वाढेल. नसती चिंता लागून राहील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) जपून पावले टाका. उष्णतेचा त्रास संभवतो. भलते धाडस नको. विश्रांती घ्या.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वृद्धी होईल. नवीन संधी चालून येतील. मात्र घाई नको. काळजीपूर्वक व्यवहार करा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) “अति घाई, संकटात नेई” काळजीपूर्वक नियोजन करा. राजकीय भाष्य टाळा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) जमीन व्यवहारासाठी काहीसा वेळ लागू शकतो. नियोजन बदलावे लागेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. चैन कराल. आप्त भेटतील. जंगलात फिरताना मात्र काळजी घ्या.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *