राशिभविष्य

सोमवार, २ मे २०२२. वैशाख शुक्ल द्वितीया. वसंत ऋतू.
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्रनक्षत्र – कृतिका
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आनंदी राहाल. समाधान लाभेल. सुखाची अनुभूती मिळेल. कामे मार्गी लागतील. कला प्रांतात चमक दाखवाल.
 
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आत्मविश्वास वाढेल. आनंदाचे क्षण येतील. वाहन खरेदी होईल. प्रवास सुखकारक होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) पर्यटन कराल. आवडत्या छंदासाठी खर्च कराल. मन आनंदी राहील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) स्वप्ने साकार होतील. आर्थिक भरभराट होईल. मोठ्ठी खरेदी होईल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अडथळे दूर होतील. सौख्य लाभेल. बढती/ बदलीचे योग आहेत.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) वारसा हक्काची कामे मार्गी लागतील. दूरचे प्रवास संभवतात. कर्जेमंजूर होतील. येणी वसूल होऊ शकतात.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामाची ताण वाढेल. मात्र आर्थिक लाभ होतील. शेअर्स मधून चांगला परतावा मिळू शकेल. लॉटरीचे तिकीट काढून बघा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) जोडीदार खुश राहील विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. सहकारी चांगली साथ देतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामे मार्गी लागतील. आर्थिक प्रगती होईल. उत्तम दिवस आहे. मेहनत वाढवावी लागेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तुंग भरारी घ्याल. पराक्रम गाजवाल. दिगंत कीर्ती पसरेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कामाची सुरुवात काहीशी संथ होईल. घरात काही मोठे बदल कराल. मातेची काळजी घ्या.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम लाभाचा दिवस आहे. लेखकांना यश मिळेल. नात्यातून चांगला प्रतिसाद मिळेल. भावंड मदत करतील.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

4 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

4 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

4 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

5 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

5 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

5 hours ago