राशिभविष्य

शुक्रवार, ३ जून २०२२.

जेष्ठ शुक्ल चतुर्थी. ग्रीष्म ऋतू उत्तरायण. शुभकृत नाम संवत्सर.

राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००

“आज दुपारी २.०० पर्यंत चांगला दिवस , *विनायकी चतुर्थी* आहे. ” आज ‘वृद्धी योग आहे’

चंद्र नक्षत्र – पुनर्वसू (संध्याकाळी ७.०५ पर्यंत) चंद्र दुपारी १२.२० पर्यंत मिथुन राशीत आहे. नंतर कर्क राशीत प्रवेश. चंद्र – लाभ – बुध.
चंद्र – त्रिकोण – नेपच्यून.

मेष:- प्रगतीसाठी पोषक कालावधी आहे. वेळ दवडू नका. कामे मार्गी लागतील.

वृषभ:- प्रवास कार्यसाधक होतील. व्यवसायात वाढ होईल. छंद जोपासना होईल.

मिथुन:- मेजवानी मिळेल. आनंदात दिवस व्यतीत होईल. दुपारनंतर कामे मार्गी लागतील.

कर्क:- संमिश्र ग्रहमान आहे. मन विचलित होईल. कुलदेवतेची उपासना लाभदायक ठरेल. सकाळी महत्वाची कामे नकोत.

सिंह:- उत्तम ग्रहमान आहे. यश मिळेल. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. सकाळी कामे पूर्ण करा. संध्याकाळ विश्रांतीची.

कन्या:- आर्थिक परिस्थिती सुधारणा होईल. व्यवसायात यश मिळेल. संशोधन कार्यात यश मिळेल.

तुळ:- सौख्य लाभेल. प्रवास संभवतात. मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी सन्मान होईल.

वृश्चिक:- कामाचा ताण वाढेल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. विश्रांती घ्या. दिवसाचा उत्तरार्ध चांगला आहे.

धनु:- प्रेमात यश मिळेल. प्रवासातून लाभ होतील. दुपार नंतर महत्वाची कामे नकोत.

मकर:- यशदायी कालावधी आहे. दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ होतील. कामे मार्गी लागतील.

कुंभ:- अनुकूल दिवस आहे. दुपार नंतर सौख्य लाभेल. अध्यात्मिक प्रगती होईल.

मीन:- जागा खरेदी विक्री होईल. शेतीतून लाभ होतील. संवाद साधून मने जिंकाल.

. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *