सोमवार, १३ जून २०२२.

जेष्ठ शुक्ल चतुर्दशी, उत्तरायण, ग्रीष्म ऋतू. शुभकृत नाम संवत्सर.

राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

“आज उत्तम दिवस, ‘सिद्ध’ योग आहे.

चंद्रनक्षत्र – अनुराधा (रात्री ९.२४ पर्यंत)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. काळजी घ्या. आराम करा. आज फार दगदग नको. येणी वसूल होतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सौख्य लाभेल. शत्रू पराभूत होतील. कामास विलंब होईल. संशयकल्लोळ टाळा. विवाह इच्छुकांना शुभ संचार समजतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभाचा दिवस आहे. मनासारखी कामे पार पडतील. काळजी दूर होईल. संधी सोडू नका.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आत्मविश्वस डळमळीत होऊ देऊ नका. कणखर भूमिका घ्या. कर्जे मंजूर होतील. आर्थिक तरतूद होईल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) घरात महत्वाचे बदल कराल. आज महत्वाची कामे नकोत. संयम आवश्यक आहे. राजकारणात यश मिळेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम लाभ होतील. महत्वाची कामे आज पूर्ण करून घ्या. प्रेमात यश मिळेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कौतुक होईल. नवीन संधी चालून येतील. व्यवसायात वाढ होईल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) शुभ कालावधी आहे. महत्वाच्या भाटीगाठी होतील. गुंतवणूक कामी येईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) जमिनीची कामे मार्गी लागतील. मोठे करार होतील. व्यवसाय वाढेल. मात्र खर्च देखील वाढेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अति उत्तम दिवस आहे. आनंदात वेळ जाईल. महत्वाची बोलणी करा. संधीचे सोने कराल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील. धावपळ वाढेल. आर्थिक तजवीज होईल.

मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था, दे,दो,चा,ची) प्रवास घडतील. त्यातून लाभ होतील. जबाबदारी वाढेल. कठोर भूमिका घ्याल.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Devyani Sonar

Recent Posts

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या नाशिकरोड : प्रतिनिधी तलवारीचा धाक दाखवत…

4 hours ago

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण

आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण मनमाड : आमिन शेख आगामी होणाऱ्या…

4 hours ago

नाशिक जिल्हा परिषदेतील वित्त विभागाच्या दोघा अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले

नाशिक: प्रतिनिधी वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अकरा हजार रुपयांची लाच घेताना …

14 hours ago

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस काजी सांगवी : वार्ताहर…

1 day ago

बाळ अदलाबदल प्रकरणी मोठी कारवाई, 8 डॉक्टर,1 परिचारिका निलंबित

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल झालेल्या बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.…

1 day ago

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सातपूर: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकार्‍यांच्या…

2 days ago