नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप रचनेवर नोंदविण्यात आलेल्या हरकतींची सुनावणी सोमवारी (दि. 13) विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिकरोड यांच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता होणार आहे
राज्य निवडणूक आयोगामार्फत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका 2022 मध्ये मुदत संपणार्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची प्रारूप रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासंदर्भात नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसाठी गटांची व पंचायत समिती गणांची प्रारूप रचनेच्या कार्यक्रमाची अधिसूचना 2 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार 2 जून ते 8 जून या कालावधीत सदर प्रारूप रचनेवर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या.
सदर हरकती व सूचनांवर होणारी सुनवाणी आज सोमवारी (दि.13) होणार असल्याने सुनावणीबाबत झालेल्या या बदलाची हरकतधारकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी कळविले आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…