राशिभविष्य

२६ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

तुमच्यावर शनि, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही चंचल आहात. नीटनेटकेपणा, सौंदर्य प्रसाधने, गुलाब पुष्प, गृह सजावट यांची तुम्हाला आवड आहे. मित्रणाबरोबर प्रवास प्रिय आहे. आर्थिक बाबतीत नशीबवान आहेत.तुम्ही उत्स्फूर्तआणि उत्साही आहात. प्रेमात अपयश येऊ शकते. तुमच्या जीवनात बऱ्याचशा गोष्टी उशीराने घडतात. शिस्त, गांभीर्य, कर्तव्य याची जाणीव तुम्हाला प्रामुख्याने असते. तुम्ही सखोल विचार करणारे आणि स्थिर मनाच्या आहात. तुम्ही समतोल वृत्तीने सर्वत्र बघतात. कोणत्याही प्रश्नांची दुसरी बाजू तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतात. तुमच्याबद्दल इतर लोकांचे बरेच गैरसमज असतात. तुम्ही तुमच्या कामामध्ये सतत मग्न असतात. तुम्ही धोरणी आणि चतुर आहात. निसर्ग, संगीत, सौंदर्य यांचे तुम्हाला आवड आहे. स्वतःच्या अधिकारांची तुम्हाला जाणीव असते. दुर्बल लोकांबद्दल तुम्हाला आपुलकी आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुम्ही उत्तम व्यवस्थापन करू शकतात. तुम्ही न्याय प्रेमी, कायदा प्रेमी आहात. तुमच्या आर्थिक नियोजन काटेकोर असते. तुम्ही इतरांना योग्य वेळी मदत करतात. तुम्ही दीर्घोद्योगी आहात आणि तुम्हाला आयुष्यात उशिरा यश मिळते मात्र ते बराच काळ टिकते.

व्यवसाय:- सर्वप्रकारची शास्त्र, स्टॅटिस्टिक्स, अवघड गणित, संशोधन, बँकिंग, प्रयोगशाळा उपकरणे, अकाउंट, पॅथॉलॉजी, वकील.

शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शुक्रवार.

शुभ रंग:- जांभळा, हिरवा, राखाडी, गडद निळा.

शुभ रत्न:- इंद्रनील, पाचू, काळा मोती. अमेथिस्ट, लसण्या.

 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

रविवार, २६ जून २०२२.

जेष्ठ कृष्ण त्रयोदशी. ग्रीष्म ऋतू. शुभकृत नाम संवत्सर.

राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००

“वर्ज्य प्रदोष, ‘शूल’ योग आहे”

नक्षत्र – कृतिका (दुपारी १.०६ पर्यंत)

मेष:- कलाकारांना अत्यन्त उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. आनंदी राहाल.

वृषभ:- प्रसन्न दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. चैनीवर खर्च कराल.

मिथुन:- आध्यत्मिक लाभ होतील. स्वतःसाठी खर्च कराल. मौज कराल.

कर्क:- अति उत्तम दिवस आहे. मनासारखी कामे होतील. आर्थिक लाभ होतील.

सिंह:- कामाच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. उडसी दूर होईल. स्वप्ने साकार होतील.

कन्या:- अनुकूलता वाढीस लागेल. प्रवास घडतील. कीर्ती आणि यश मिळेल.

तुळ:- धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. सूचक घटना घडतील. पुढील मार्गदर्शन मिळेल.

वृश्चिक:- प्रेमात यश मिळेल. विवाह इच्छुकांना शुह संचार समजतील. कुटुंब आनंदी राहील.

धनु:- उद्योग व्यवसायास अत्यंत अनुकूल दिवस आहे. मौल्यवान खरेदी किंवा दागिने खरेदी कराल.

मकर:- कामे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. छोटे प्रवास संभवतात.

कुंभ:- जमिनीची कामे मार्गी लागतील. इस्टेट एजंटना भरघोस यश मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील.

मीन:- आर्थिक बाजू भक्कम राहील. लेखकांना चांगला कालावधी आहे. नात्यातून लाभ होतील.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *