२७ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर मंगळ, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव. तुम्ही सुदृढ आहात. उत्तम वक्तृत्व, हरहुन्नरी स्वभाव ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. मान सन्मान आणि प्रतिष्ठा तुम्हाला अधिक प्रिय आहे. जीवनातील खरा आनंद शिक्षण देण्यात आहेअसे तुम्हालावाटते. किरकोळ बाबींवर तुम्ही अस्वस्थ होतात. अहंकार असल्याने मित्र परिवार छोटा आटो. तुमचे व्यक्तिमत्वात विरोधाभास आहे. तुम्ही आक्रमक, धाडसी, तडफदार आणि लढाऊ वृत्तीचे आहात. तुम्ही महत्त्वाकांक्षी आहात आणि तुमच्या कर्तृत्वाबद्दल तुम्हाला पुर्ण विश्वास आहे. तुम्हाला शक्तिशाली खेळांची आणि व्यायामाची आवड आहे. इतरांवर तुम्ही दया करतात मात्र त्यातून तुम्हाला एक प्रकारचा आनंद मिळतो. आजारी लोकांना तुम्ही स्वतःचे क्षमतेने बरे करू शकतात. तुम्ही शीघ्रकोपी आहात मात्र स्वतःच्या मनावर ताबा ठेवू शकतात. बौद्धिक क्षेत्रात काम करणे तुम्हाला आवडते. तुमचे विचार ठाम आहेत. तुम्हाला तुमची मुले आणि बहिणी जास्त प्रिय असतात. तुम्ही कायदा प्रेमी आहात. जबाबदारीच्या जागांवर तुम्ही काम करू शकतात. तुमची मनाची शक्ती अफाट असून तुम्हाला गूढ अनुभव येतात. तुम्हाला प्रवासातून अनेक अनुभव येतात आणि त्यामुळे तुमचे जीवन परिपक्व होते. तुम्ही अभ्यासू वृत्तीचे आहात. इतरांच्या पेक्षा तुमचे विचार पुढे असतात. तुम्ही तुमच्या मतांशी ठाम असतात. विनाकारण इतरांची खोडी काढणे तुम्ही टाळले पाहिजे. आयुष्यात अहंकार आणि पोकळ दिमाख याला काही अर्थ नाही. तुम्ही बोलण्यामध्ये आणि वक्तृत्वात प्रवीण आहात. स्वतःची चूक तुम्ही कधीही मान्य करत नाहीत. इतरांवर टीका करणे टाळल्यास तुम्ही अधिक प्रगती करू शकाल.
व्यवसाय:- हॉटेल व्यवस्थापन, संगीतकार, दाग-दागिने विक्री, बेकरी, गृहसजावट, पोलीस, मिल्ट्री, डॉक्टर, केमिस्ट, लोखंड, बांधकाम क्षेत्र, इंजिनिअर.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:- तांबडा, पिवळा, पांढरा.
शुभ रत्न:- पाचू, पुष्कराज, मोती माणिक.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
सोमवार, २७ जून २०२२.
जेष्ठ कृष्ण चतुर्दशी. ग्रीष्म ऋतू. दक्षिणायन, शुभकृत नाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
आज अनिष्ट दिवस, ‘शूल’ योग आहे.
चंद्रनक्षत्र: रोहिणी (दुपारी ४.०२ पर्यंत)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल. वक्तृत्व बहरेल. शब्दास मान मिळेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आवडत्या पद्धतीने दिवस साजरा कराल. येणी वसूल होतील. आनंदी राहाल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) गोंधळून जाण्याची शक्यता आहे. महत्वाची कामे आज नकोत. संयम ठेवा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) चतुर्याचे कौतुक होईल. आजचे निर्णय लाभदायक ठरतील. मौज कराल. आनंदी राहाल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामानिमिटत भ्रमंती होईल मात्र त्यातून लाभ होतील. कौटुंबिक सुख लाभेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) दूरचे प्रवास होतील. त्यातून आनंद मिळेल. नवीन ओळखी होतील. येणी वसूल होतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतील. प्रवासातून त्रास जाणवतो. इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होऊ शकतात.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) शुभ समाचार समजतील. जमीन व्यवयात फायदा होईल. धंद्यात लाभ होतील. धाडसी निर्णय घ्याल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उत्तम आर्थिक लाभ होतील. नात्यातून फायदा होईल. भावंड मदत करतील. जुने वाद संपतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) इस्टेट आणि तंत्रज्ञान यातील मंडळींना भरपूर फायदा होईल. मुलांचे प्रश्न सुटतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) लिखापढी/ राजकीय लेखन यातून लाभ होतील. आध्यत्मिक उंची वाढेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) मान सन्मान होईल. नफा वाढेल. कठोर बोलणे टाळा. संयम ठेव.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –