नाशिक पुन्हा हादरले, सिडकोत महिलेचा खून
नाशिक प्रतिनिधी
महिलेचा गळा चिरून खून केल्याची घटना चुंचाळे शिवारात घडली,
संगीता सचिन पवार असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे, संगीता आणि तिचा पती सचिन आणि एक लहान मुलगी असे तिघे जण चार पाच दिवसापूर्वीच चुंचाळे येथे राहण्यास आले होते, सचिन हा पेंटिंग ची कामे करतो, अंबड पोलिसांना आज पहाटे औरंगाबाद येथील नियंत्रण कक्षातून फोन आला त्यानुसार अंबड पोलिसांचे एक पथक आंबेडकर्नागर येथील घटनास्थळी पोचले असता त्यांना एक महिला गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आली, प्रथम दर्शनी या महिलेचा खून झाल्या चे उघड झाले आहे, मात्र तो पतीने केला की यात अन्य व्यक्ती आहे याचा शोध घेतला जात आहे,