रवीवार, ३ जुलै २०२२.

आषाढ शुक्ल चतुर्थी, दक्षिणायन, ग्रीष्म ऋतू, शुभकृतनाम संवत्सर.

राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००

“संध्याकाळी ५.०० नंतर चांगला दिवस, विनायक चतुर्थी, आज ‘वज्र’ योग दुपारी १२.०५ पर्यंत त्यानंतर ‘सिद्धी योग आहे”

चंद्र नक्षत्र – आश्लेषा नक्षत्र सकाळी ६.३० पर्यंत आहे त्यानंतर ‘मघा’

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) विंचू काट्यापासून सावध रहा. कामात अडथळे निर्माण होतील. काळजीपूर्वक निर्णय घ्या.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक लाभ होतील. मानसिक सौख्य लाभेल. स्वजनांशी वैर निर्माण होऊ शकते. संयमाने घ्या.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सुखाचा दिवस आहे. तुमचा दबदबा वाढेल. आर्थिक लाभ होतील. दीर्घकालीन नफा होईल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) वक्तृत्व बहरेल. नेतृत्व गुण उदयास येतील. मार्गदर्शकाच्या भूमिकेत जाल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आत्मविश्वास वाढलेला आहे. अडचणी दूर होतील. कामे मार्गी लागतील. दुपार नंतर परिस्थिती सुधारेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) दुपारनंतर अनुकूलता नाही. विंचू काट्याचे भय आहे. वाहने जपून चालवा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) मान मरातब वाढेल. कीर्ती दिगंत पसरेल. उत्तम कालावधी आहे.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अधिक काम करावे लागेल. उद्योग व्यवसायात अचानक काही समस्या येऊ शकते.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उच्च शिक्षण संबंधित कामे मार्गी लागतील. अकल्पित धन प्राप्त होऊ शकते. गूढ स्वप्ने पडतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विश्रांतीची गरज आहे. पाण्यापासून सावध रहा. भलते साहस नको.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मत्सर त्रास जाणवेल. धावपळ होईल. जोडीदार योग्य सल्ला देईल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम लाभ होतील. व्यवसायात यश मिळेल. येणी वसूल होतील.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago