महाराष्ट्र

विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर

पहिल्या अग्निपरिक्षेत शिंदे गट पास, शिवसेनेचा व्हीप झुगारला
मुंबई: शिंदे गट आज झालेल्या पहिल्या अग्निपरिक्षेत पास झाला विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर भारतीय जनता पार्टी चे राहुल नार्वेकर यांची निवड झाली, महाविकास आघाडीचे राजन साळवी यांचा त्यांनी पराभव केला, शिवसेनेला हा आणखी एक धक्का बसला आहे, सेनेने व्हीप जारी केला होता मात्र तरीही सरशी शिंदे गटाचीच झाली,  एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेले महाविकास आघाडी सरकार कोसळले, त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर  उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली, त्यानंतर विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर करण्यात आली, या पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या आणि शिंदे गटाच्या वतीने राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडी ने शिवसेनेचे उपनेते राजन साळवी यांची उमेदवारी जाहीर केली,आजपासून विधिमंडळ अधिवेशनास प्रारंभ झाला,  उपसभापती नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली, उद्धव ठाकरे यांनी पक्ष प्रयोद बदलला  सुनील प्रभू यांची निवड करण्यात येऊन त्यांनी बंडखोर आमदार तसेच शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हीप बजावला होता, यावर एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत असल्याने शिवसेनेचा व्हीप आम्हाला लागू होत नाही असा दावा केला होता, मतदान प्रक्रियेला प्रारंभ होताना सदस्य मोजणीच्या वेळी थोडा गोंधळ उडाला, शीर गणती करण्यात येऊन मतमोजणी करण्यात आली, राहुल नार्वेकर यांना 164 तर राजन साळवी यांना   1 07 मते मिळाली, समाजवादी पार्टीचे  अबू आझमी ,रईस शेख, शाह फारूक अन्वर,  हे तटस्थ राहिले,

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

9 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

9 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

10 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

10 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

10 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

10 hours ago