शुक्रवार, ६ मे २०२२. वैशाख शुक्ल पंचमी. वसंतऋतू.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज चांगला दिवस आहे. *श्री. आद्य शंकराचार्य जयंती* घबाड दुपारी १२.३३ नंतर. आज धृती योग संध्याकाळी ७.१९ पर्यंत आहे. त्यानंतर शूल योग आहे.
चंद्र नक्षत्र – आर्द्रा सकाळी ९.२० पर्यंत
मेष:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील. यश मिळेल. कीर्ती वाढेल.
वृषभ:- संमिश्र दिवस आहे. अकस्मात घटना घडतील. कलाकारांना यश मिळेल.
मिथुन:- अचानक धनलाभ होईल. गुंतवणुकीतून लाभ होतील. मान सन्मान प्राप्त होतील.
कर्क:- आवडत्या छंदासाठी खर्च कराल. चैन कराल. आर्थिक नियोजन कोलमडले.
सिंह:- दूरचे प्रवास घडतील. काटेकोर नियोजन कराल. तात्विक वादात यश मिळेल. राजकीय लेखन कराल.
कन्या:- कामात मन रमेल. व्यवसायात यश मिळेल. नवनवीन शोध लागतील. संशोधन कराल.
तुळ:- प्रिय नातलग भेटतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मुलांशी संवाद होईल.
वृश्चिक:- पत्नीकडून लाभ होतील. स्त्री धनात वाढ होईल. कामाचा उरक वाढवावा लागेल.
धनु:- जोडीदाराचे भावंड मदत करतील. अडचणी दूर होतील. नवीन मार्ग सापडतील.
मकर:- राजकारणात यश मिळेल. सन्मान मिळतील. आरोग्य चांगले राहील. क्रीडा क्षेत्रात यश मिळेल.
कुंभ:- पराक्रमी दिवस आहे. धाडसी निर्णय घ्याल. काहीतरी नवीन गवसेल.
मीन:- शब्दास मान मिळेल. पशूलाभ होईल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल मात्र कागदपत्रे काळजीपूर्वक तपासून घ्या.
मंगेश पंचाक्षरी –